scorecardresearch

Video: आईला ब्रेन ट्युमर झाल्याने राखी सावंतला अश्रू अनावर, रुग्णालयातून रडत व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “बिग बॉसच्या घरात…”

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आईच्या प्रकृतीबद्दल सांगताना रडू लागते.

Video: आईला ब्रेन ट्युमर झाल्याने राखी सावंतला अश्रू अनावर, रुग्णालयातून रडत व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “बिग बॉसच्या घरात…”
(फोटो – स्क्रीनशॉट)

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत अलीकडेच ‘बिग बॉस मराठी’मध्ये दिसली होती. या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये ९ लाख रुपये घेऊन ती बाहेर पडल. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच तिला एक वाईट बातमी ऐकायला मिळाली. तिने ती बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

राखी सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने सांगितलं की तिची आई जया भेदा यांना कॅन्सरनंतर ब्रेन ट्यूमर झाला आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता राखीने हॉस्पिटलमधून रडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखी म्हणते की, “मी नुकतीच बिग बॉस मराठीमधून बाहेर पडली आहे. मी बाहेर येताच मला कळलं की आईची प्रकृती बरी नाही. ती आता रुग्णालयात आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मला तुमच्या सर्व आशीर्वादांची गरज आहे. कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा. तिला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. मला बिग बॉसच्या घरात कोणीही सांगितले नाही की तिची प्रकृती ठीक नाही. मला माहित नव्हतं की ती रुग्णालयात दाखल आहे आणि तिला ब्रेन ट्यूमर झाला आहे.”

९ लाख रुपये घेऊन ‘बिग बॉस’ मराठीतून बाहेर पडताच राखी सावंतसाठी वाईट बातमी; स्वतःच माहिती देत म्हणाली…

व्हिडीओमध्ये पुढे, राखी एका व्यक्तीला विचारते, “काय झालंय?” त्यावर ती व्यक्ती म्हणते की “आईच्या शरीराला डाव्या बाजूने अर्धांगवायू झाला होता आणि तिला रुग्णालयात आणण्यात आलं होतं. इथे स्कॅन आणि एमआरआय केल्यानंतर त्यांनान ब्रेन ट्यूमरचं निदान झालंय. मात्र त्यांचे आणखी रिपोर्ट्स येणं बाकी आहे.”

हे ऐकून राखीने तिच्या आईसाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आणि ती रडू लागली. राखीचे मित्र-मैत्रिणी आणि तिचे चाहते तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत आईसाठी प्रार्थना करत असल्याचं म्हणत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 15:27 IST

संबंधित बातम्या