जवळपास सर्वच सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. काही फोटो बोल्ड असतात, काही पारंपारिक लूकमधले असतात, पण काही फोटो असेही असतात जे पाहून तो अभिनेता किंवा ती अभिनेत्री नेमकी कोण आहे, ते आपल्याला ओळखता येत नाही. बऱ्याचदा कलाकार स्वतःच त्यांचे असे फोटो शेअर करतात, त्यामुळे ते कोण आहे, हे लगेच कळतं. पण काही वेळा पापराझींच्या अकाउंवरून असे फोटो शेअर केले जातात, त्यामुळे चाहते अंदाज लावून ते कलाकार ओळखतात.

एका अभिनेत्रीचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ही अभिनेत्री बोल्ड शिमरी ब्रालेट व ऑफ व्हाइट लाँग पँट घालून बसलीये आणि तिने ऑफ व्हाइट टोपीने तिचा चेहरा झाकला आहे. तिच्या हातात हटके डिझाइन असलेलं ब्रेसलेट देखील आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे, ते ओळखण्यास चाहत्यांना सांगण्यात आलंय. काहींनी ही या अभिनेत्रीला बॉस लेडी म्हटलंय. तर, अनेकांनी ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक असल्याचं म्हटलंय.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दरम्यान, रुबिना दिलैकने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यातलाच हा एक फोटो आहे. ‘हॅलो ब्युटिफूल पिपल’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं होतं.

रुबिनाच्या या फोटोवर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील तिच्या मित्र-मैत्रिणींनी हार्ट इमोजी कमेंट करत लाइक्स व शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader