scorecardresearch

Video : “प्रिय प्राणनाथ…” ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरेला तरुणीने घातली लग्नाची मागणी, पत्र ठरतंय चर्चेचा विषय

याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

Video : “प्रिय प्राणनाथ…” ‘बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरेला तरुणीने घातली लग्नाची मागणी, पत्र ठरतंय चर्चेचा विषय
शिव ठाकरे

बिग बॉस हा रिअॅलिटी शो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. शिव ठाकरेने बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकले होते. या पर्वानंतर आता शिव हा बिग बॉस १६ मध्ये सहभागी झाला आहे. या कार्यक्रमात पहिल्या दिवसांपासूनच शिवने सर्व रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपासून शिव ठाकरेच्या लव्ह लाईफबद्दल बिग बॉसमध्ये चर्चा होताना दिसत आहेत. त्यातच आता शिव ठाकरेला एका मुलीने लग्नाची मागणी घालणारं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरत आहे.

शिव ठाकरे हा हिंदी बिग बॉस सीझन १६ मध्ये सहभागी झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून कायमच तो चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात प्रत्येकाला वेळोवेळी मदत करणारा, टास्क पूर्ण करणारा आणि सदस्यांना धीर देणारा म्हणून त्याने ओळख निर्माण केली आहे. बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेला चक्क एका तरुणीने लग्नासाठी प्रपोज केले आहे. तिने एक प्रेम पत्र लिहित त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
आणखी वाचा : “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या अन् बिग बॉस…” शिव ठाकरेने केला खुलासा

बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी ख्रिसमस स्पेशल भाग प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेता शेखर सुमन यांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी बिग बॉसमधील स्पर्धकांना त्यांच्यासाठी आलेली काही मजेशीर पत्र वाचून दाखवली. यावेळी शिव ठाकरेसाठी सुंदर प्रेम पत्र आले होते. या पत्राला अगदी नवरीप्रमाणे सजवण्यात आले होते.

शिव ठाकरेसाठी आलेल्या पत्रात नेमकं काय?

“प्रिय प्राणनाथ, तू बिग बॉसच्या घरात खूप साऱ्या मुली पाहिल्या असशील. पण मी तुला विश्वास देते की माझ्याइतकी संस्कारी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. मी तुला टीनासारखी कधीही उलट उत्तर देणार नाही. तसंच मी सुमबुलसारखं सगळं काही निमूटपणे सहन करेन. मी कठीण प्रसंगातही तुझ्याबरोबर उभी राहिन. पण मी साजिद खानवर खूप नाराज आहे कारण तू आजकाल साजिदच्या खूपच जवळ जात आहे. का कुणास ठाऊक पण मला साजिदमध्ये माझी सवत दिसू लागली आहे. लग्नानंतर हे सगळं चालणार नाही”, असे त्यात लिहिले आहे.

आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

शेखर सुमनने वाचलेल्या या मजेशीर लग्नाच्या प्रस्तावावर शिव ठाकरेची अनेकांनी मस्करी केली आहे. त्याबरोबर शेखर सुमन यांनी अनेक सदस्यांची पत्रही यावेळी वाचून दाखवली. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. दरम्यान बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात शिव ठाकरे हे नाव सातत्याने चर्चेत आहे. या नावाची चर्चा ही सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आही.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 15:16 IST

संबंधित बातम्या