‘बिग बॉस हिंदी’च्या घरात मराठमोळ्या शिव ठाकरेची चांगलीच चर्चा पाहायला मिळाली. शिव ठाकरेने फक्त मराठी नव्हे तर आता बॉलिवूडकरांच्या मनातही स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बिग बॉस १६ च्या घरातून परत आल्यापासून सातत्याने तो चर्चेत आहे. शिवच्या लग्नाबद्दल आणि त्याच्या आईबद्दल अनेक चर्चा समोर येताना दिसत आहे. नुकतंच शिव ठाकरेने अमरावतीच्या मुलीशी लग्न करण्याबद्दल भाष्य केले आहे.

शिव ठाकरेने आतापर्यंत अनेक मुलाखती दिल्या आहेत. यात दिलेल्या एका मुलाखतीत शिव ठाकरेने त्याच्या आईने लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मध्यंतरी शिवच्या आईने एका मुलाखतीमध्ये त्याच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी शिव ठाकरे हा अमरावतीच्या मुलीशीच लग्न करणार, असे त्या म्हणाल्या होत्या. त्याबरोबरच मी पसंत करेल त्याच मुलीशी त्याला लग्न करायचं आहे असं शिवची आई म्हणाली होती. त्यावर आता शिवने उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : “हिने डायपर का घातलाय?” जिममधील कपड्याच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राखी सावंत ट्रोल

“आई प्लीझ अशा गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलत जाऊ नकोस, जर मला दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या एखाद्या मुलीबरोबर प्रेम झालं तर तू काय करणार?”, असा प्रश्न शिव ठाकरेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आईला विचारला आहे.

“मी अमरावती किंवा इतर कोणत्याही ठिकाणची कोणीही मुलगी अजून ठरवलेली नाही. मला आता जे मिळतंय त्याचे मला सोनं करायचं आहे. या जगात प्रेम कोणाला नको आहे, पण एखादी मुलगी दिसायला चांगली आहे, म्हणून तिच्यावर प्रेम झालं असं होत नाही. प्रेम होताना मनात काहीतरी होतं, तेव्हा तुम्ही प्रेम झालं असं म्हणू शकता”, असेही शिव ठाकरे म्हणाला.

आणखी वाचा : ‘…तरच मी काढेन’ वीणाच्या नावाचा टॅटू लपवण्यावर शिव ठाकरे स्पष्टच बोलला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण माझी आई जे माझं मार्केट खराब करत आहे, आई बघ अमरावतीची ठिक आहे, पण मला इतर कोणत्याही ठिकाणी असणारी मुलगी पसंत येऊ शकते”, असेही शिव ठाकरेने सांगितले.