scorecardresearch

‘सहकुटुंब सहपरिवार’च्या मुख्य कलाकाराची मालिकेमधून एक्झिट, अभिनेत्री नंदिता पाटकर म्हणते, “आगाऊ माणूस…”

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेच्या मुख्य कलाकाराचा मालिका सोडण्याचा निर्णय. सहअभिनेत्रीची पोस्ट चर्चेत.

‘सहकुटुंब सहपरिवार’च्या मुख्य कलाकाराची मालिकेमधून एक्झिट, अभिनेत्री नंदिता पाटकर म्हणते, “आगाऊ माणूस…”
'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेच्या मुख्य कलाकाराचा मालिका सोडण्याचा निर्णय. सहअभिनेत्रीची पोस्ट चर्चेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. या मालिकेमधील कलाकारांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. आता ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या मुख्य कलाकाराने मालिका सोडली असल्याचं समोर आलं आहे. मालिकेमध्ये सरिता वहिनी हे पात्र साकारणाऱ्या नंदिता पाटकर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – दोन्ही किडन्या निकामी, आर्थिक चणचण, औषधांचाही खर्च भागेना; प्रसिद्ध अभिनेत्रीला काम मिळणंही झालं बंद, म्हणाली, “डायलिसिसमुळे मला…”

‘सहकुटुंब सहपरिवार’मध्ये वैभव हे पात्र साकारणारा अभिनेता अमेय बर्वे ही मालिका सोडत असल्याचं समोर आलं आहे. अमेय या मालिकेमुळेच प्रकाशझोतात आला. आता त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नंदिताने अमेय तसेच मालिकेच्या टीमसह काही फोटोही शेअर केले आहेत.

नंदिता म्हणाली, “अम्या… हक्काने भांडणारा, हट्ट करणारा, मस्का मारणारा, खोड्या काढणारा. जगातला आगाऊ माणूस आहेस तू. जिकडे जाशील तिकडे माणसं जोडतोस. इतका जीव लावतोस की तू जाताना लोकं नुसती रडारड करून हैराण. तुझी स्टाईल, तुझा वावर सगळ्यांना हवाहवासा वाटणारा. तुझा सेन्स ऑफ ह्युमर इतका विचित्र की तुझ्यावर कितीही राग आला तरी समोरच्याला हसायला भाग पाडणारा.”

आणखी वाचा – घड्याळ, सोन्याचं ब्रेसलेट अन् एकाचवेळी अशोक सराफ यांनी बायकोला दिल्या आठ साड्या, निवेदिता म्हणतात, “मॉरिशसवरुन त्याने…”

“जा भिडू जी ले अपनी जिंदगी. जा आणि सगळ्यात उत्तम काम कर. खूप सारं प्रेम. तुझी खूप आठवण येईल. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा.” नंदिताच्या पोस्टद्वारे अमेय या मालिकेमध्ये दिसणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 11:27 IST

संबंधित बातम्या