scorecardresearch

Premium

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने गोव्यात सुरू केला नवा व्यवसाय; म्हणाली, “आमचं छोटंसं घर आता…”

‘सुंदरा मनामध्ये भरली’ अभिनेत्रीचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी…

akshaya naik started home stay hotel business in goa
'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीने सुरू केला नवा व्यवसाय

मराठी कलाविश्वातील निरंजन कुलकर्णी, अनघा अतुल, अभिज्ञा भावे, प्रार्थना बेहेरे, तेजस्विनी पंडित अशा असंख्य कलाकारांनी गेल्या काही दिवसांमध्ये व्यवसाय क्षेत्रात एक नवी भरारी घेतली आहे. अभिनय क्षेत्र सांभाळून या कलाकारांनी कपडे, हॉटेल, सौंदर्य प्रसाधनांशी संबंधित असे स्वत:चे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. यात आता छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीचं नावं जोडलं गेलं आहे.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये लतिकाची मुख्य भूमिका साकारणारी अक्षया नाईक आता घराघरांत लोकप्रिय झाली आहे. अक्षयाचं मूळ गाव गोव्यात आहे. त्यामुळे अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या साथीने गोव्यात हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अक्षयाच्या गोव्यातील सुंदर बंगल्यात आता नागरिकांना भाडं भरून राहता येणार आहे. ‘नाईक होम स्टे’ असं तिने या बंगल्याचं नाव ठेवलं आहे.

Drunken youths on Vetal Hill Audiocast by actor Ramesh Pardeshi
वेताळ टेकडीवर नशेबाज युवक- युवती; अभिनेते रमेश परदेशींकडून ध्वनिचित्रफीत प्रसारित
divya agarwal and apurva padgaonkar
दिव्या अग्रवाल झाली मराठी कुटुंबाची सून, तिचा पती आहे प्रसिद्ध उद्योजक, तर ती अभिनयाशिवाय करते ‘हा’ व्यवसाय
Suhani Bhatnagar
‘डरमॅटोमायोसायटिस’ आजार आहे तरी काय? ज्यामुळे ‘दंगल’गर्ल सुहानी भटनागरचे निधन
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…

हेही वाचा : ‘कल हो ना हो’ची २० वर्ष : शाहरुख खानसाठी वेगळा क्लायमॅक्स ते तेलुगू रिमेक! वाचा चित्रपटाबद्दलचे काही रंजक किस्से

अक्षया नाईक ही पोस्ट शेअर करत लिहिते, “गोव्यातील आमचं छोटंसं घर आता तुमचं झालं आहे. रोजच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन तुम्ही येथे निवांत सुट्टीचा आनंद घेऊ शकता. आमच्या नाईक होम स्टेमध्ये आजपासून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमचं हे घरगुती हॉटेल पणजीपासून ८ किलोमीटर दूर आणि करमाळी रेल्वे स्थानकापासून फक्त ३.२ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या घरात स्वागत करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतेय…”

हेही वाचा : “एखादा चौकार, षटकार…”, ‘सॅम बहादुर’ व ‘अ‍ॅनिमल’च्या क्लॅशबद्दल विकी कौशलचं क्रिकेटच्या भाषेत उत्तर

दरम्यान, अक्षया नाईकच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिच्याकडे कमेंट सेक्शनमध्ये एका दिवसाच्या भाडेदराबाबत चौकशी केली आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेनंतर अक्षयाने रंगभूमीवर पदार्पण केलं. सध्या ती ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sundara manamadhe bharli fame actress akshaya naik started home stay hotel business in goa sva 00

First published on: 28-11-2023 at 10:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×