scorecardresearch

Premium

“एखादा चौकार, षटकार…”, ‘सॅम बहादुर’ व ‘अ‍ॅनिमल’च्या क्लॅशबद्दल विकी कौशलचं क्रिकेटच्या भाषेत उत्तर

‘सॅम बहादुर’च्या प्रदर्शनाची तारीख आधी जाहीर करण्यात आली होती. तर ‘अॅनिमल’ची तारीख नंतर घोषित करण्यात आली, याबाबत विकी कौशलने दिलेली प्रतिक्रिया जाणून घ्या

vicky kaushal talks about sam bahadur animal clash
विकी कौशल 'अॅनिमल' व 'सॅम बहादूर'च्या क्लॅशबद्दल काय म्हणाला? (फोटो – इन्स्टाग्राम व इंडियन एक्सप्रेस)

१ डिसेंबर रोजी दोन बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पहिला चित्रपट म्हणजे फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या जीवनावर आधारित ‘सॅम बहादूर’ होय. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर सान्या मल्होत्रा व फातिमा सना शेख यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दुसरा चित्रपट म्हणजे रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘अॅनिमल’ होय. या सिनेमात रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल हे कलाकार आहेत.

‘सॅम बहादूर’ व ‘अॅनिमल’ दोन्हीचे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. रणबीरचा ‘अॅनिमल’ हा पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट आहे, तर ‘सॅम बहादूर’ हा सॅम माणेकशा यांचा जीवनप्रवास, त्यांची देशभक्ती प्रेक्षकांसमोर मांडणारा चित्रपट आहे. ‘अॅनिमल’च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केल्यापासून या दोन्ही चित्रपटाच्या क्लॅशची जोरदार चर्चा आहे. नक्की कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर वरचढ ठरणार, याबाबत प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे.

NCP new party symbol
शरद पवार गट तुतारी फुंकून निवडणुकीच्या रणांगणात; ‘या’ चिन्हाचे नेमके महत्त्व काय?
mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल प्रश्न विश्लेषण
loksatta analysis why sebi action against finfluencers and stock market experts
विश्लेषण: ‘सेबी’चे फिनफ्लुएन्सर आणि टीव्हीवरील ‘तज्ज्ञ’ पोपटपंचीवरील आक्षेप काय? सेबीची कारवाई कशासाठी?
online video calling scam
व्हिडीओ कॉल, पोलीस असल्याची बतावणी; ऑनलाइन फसवणुकीसाठी नवी पद्धत; काय काळजी घ्याल? वाचा….

“मी चित्रपट दोनदा पाहिला आणि…”, ‘सॅम बहादुर’बद्दल सॅम माणेकशा यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “जेव्हा विकी…”

‘सॅम बहादुर’च्या निमित्ताने विकी कौशल व मेघना गुलजार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी विकीला याबाबत विचारण्यात आलं, त्याने दिलेल्या उत्तराने लक्ष वेधून घेतलं आहे. “तुम्ही अॅनिमलच्या आधी सॅम बहादुरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती, पण आता त्याच दिवशी हाही चित्रपट प्रदर्शित होतोय, त्यामुळे तुमची निराशा झाली आहे का?” असं अनंत गोएंका यांनी विकी आणि मेघना गुलजार यांना विचारलं.

प्रश्नाचं उत्तर देत विकी म्हणाला, “मी याचं उत्तर क्रिकेटच्या भाषेत देईन. जेव्हा दोन सलामीवीर फलंदाज एकाच संघाकडून खेळण्यासाठी क्रिजवर येतात, त्यावेळी हे दोन्ही फलंदाज एकमेकांविरोधात खेळत आहेत, असं आपण म्हणू शकत नाही. कारण ते एकाच संघासाठी खेळत आहेत. आम्हीही हिंदी सिनेमासाठी काम करत आहोत. यापैकी एखादा फलंदाज कदाचित चौकार, षटकार लगावेल आणि दुसरा एक-दोन धावा काढून खेळपट्टीवर टिकून राहील आणि स्ट्राइक मेंटेन करेल.” दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असले तरी ते हिंदीच चित्रपट आहेत. एखादा जास्त व्यवसाय करेल, एखादा कमी करेल पण तो सिनेमागृहात टिकून राहील इतकाच काय तो फरक असेल असं उत्तर विकीने दिलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal talks about sam bahadur and animal clash on box office 1 december hrc

First published on: 27-11-2023 at 21:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×