scorecardresearch

‘तारक मेहता…’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याचं निधन, ४०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sunil Holkar Death: सुनील यांनी अखेरचं ‘गोष्ट एका पैठणीची’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलं होतं.

‘तारक मेहता…’ फेम मराठमोळ्या अभिनेत्याचं निधन, ४०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
(फोटो – सोशल मीडिया)

मराठमोळा अभिनेता सुनील होळकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’सह अनेक हिंदी आणि मराठी टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. ४०व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. ते मागच्या काही दिवसांपासून यकृताच्या आजाराचा सामना करत होते, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालावली.

टीव्ही ९ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील गेल्या काही दिवसांपासून लिव्हर सोरायसिसने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते, मात्र शुक्रवारी १३ जानेवारी रोजी त्यांचं निधन झालं. सुनील यांनी अखेरचं ‘गोष्ट एका पैठणीची’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम केलं होतं. सुनील यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात घरात आई, पत्नी आणि दोन मुलं आहेत.

सुनील यांना त्याच्या मृत्यूची जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी आपल्या मित्राला त्यांचा शेवटचा मेसेज व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर करण्यास सांगितलं होतं. त्यात लिहिलं होतं की ‘ही त्यांची शेवटची पोस्ट आहे’. सर्वांचा निरोप घेण्यापूर्वी, त्यांना मिळालेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानायचे आहेत, तसेच जर त्यांच्याकडून चूक झाली असेल तर माफ करावं, असं स्टेटस त्यांच्या मित्राने पोस्ट केल्याचं कळतंय.

‘तारक मेहता…’ मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘बावरी’ पात्र ‘ही’ अभिनेत्री साकारणार

सुनील यांनी अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थेत अनेक वर्षे काम केलं होतं. अभिनेता आणि कथाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांनी १२ वर्षांहून अधिक काळ रंगभूमीच्या माध्यमातून काम केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 07:43 IST

संबंधित बातम्या