‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आपलं स्थान टिकवून आहे. त्यामुळे ‘ठरलं तर मग’ला महामालिका म्हटलं जातं. अशा या लोकप्रिय मालिकेतील अर्जुन म्हणजे अभिनेता अमित भानुशाली प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक होतं आहे. सध्या अमितचा एक डान्स व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडला आहे.

अभिनेता अमित भानुशाली हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी त्याचे डान्स व्हिडीओ शेअर करत असतो. अनेकदा तो मजेशीर डान्स व्हिडीओ देखील इतर कलाकारांबरोबर करून चाहत्यांच्या मनोरंजनासाठी शेअर करतो. असा काहीसा बायकोबरोबरचा (श्रद्धा) व्हिडीओ अमित भानुशालीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेचा ‘या’ दिवशी होणार शेवटचा भाग प्रसारित, ‘असा’ होणार शेवट

“अजून करा बायकोबरोबर व्हिडीओ…”, असं कॅप्शन लिहित अमितने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला अमित बायकोबरोबर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ गाण्यावर डान्स करायला सुरुवात करतो. पण नंतर डान्स करता करता त्याची बायको त्याला मारते. त्यामुळे अमित तिला डोक्यात मारतो आणि समजवतो. पण बायको रागाच्या भरात खोटी कानशिलात लगावून निघून जाते, अशा प्रकारचा मजेशीर व्हिडीओ अमितने बायकोबरोबर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.

अमित व त्याच्या बायकोचा मजेशीर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “अरेरे बिचारा.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “असंच पाहिजे…डोक्यावर बसण्याचे परिणाम.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने हसण्याचे इमोजी देऊन लिहिलं, “किती मार खातोय हो.” चौथ्या नेटकऱ्याने सुद्धा हसण्याचे इमोजी देऊन लिहिलं, “काय रे…तुम्ही दोघं.” अमितच्या या मजेशीर व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून २० हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. तसंच २००हून अधिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: एक बार देख लीजिए…; जुईली जोगळेकरने गायलं ‘हीरामंडी’तील लोकप्रिय गाणं, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

दरम्यान, अमित भानुशालीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘ठरलं तर मग’ आधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय तो काही चित्रपटांमध्येही झळकला आहे.