छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. यंदा बिग बॉस मराठीची रंगत दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. २ ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या बिग बॉसमध्ये अनेक राडे, भांडण, स्पर्धकांमध्ये सतत होणारे वाद पाहायला मिळत आहेत. नुकतेच बिग बॉसच्या घरातील चौथे एलिमिनेशन पार पडले. निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधवला आणि त्या पाठोपाठ आता त्रिशूल मराठेला घराबाहेर पडावे लागले आहे.

आणखी वाचा : “मराठी रंगभूमीला मानाचे स्थान…” सचिन तेंडुलकरची ‘विक्रमवीर’ प्रशांत दामलेंसाठी खास पोस्ट

Gokhale bridge, beam,
गोखले पुलाच्या जोडणीला विलंब, तुळईच्या सुट्या भागांना उशीर, कंत्राटदाराकडून खुलासा मागवणार
rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…

काल ‘बिग बॉस मराठी ४’ची चावडी रंगली होती. यावेळी महेश मांजरेकरांनी चावडीवर बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली? कोण कुठे चुकले? कोण बरोबर खेळले या सगळ्याचा हिशोब घेतला. किरण माने आणि विकास सावंत यांचे महेश मांजरेकरांनी त्यांच्या खेळाबद्दल कौतुक केले. तर वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन आलेल्या स्नेहलात वसईकर हिला खडे बोल सुनावले. या एपिसोडच्या शेवटी त्रिशूल मराठे याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

बिग बॉसच्या घरात आतापर्यंत स्पर्धक म्हणून सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रातील लोकप्रिय चेहरे सहभागी झाले. पण या पर्वात त्रिशूलच्या रूपाने पहिल्यांदाच सामान्य नागरिक सहभागी झाला होता. त्यानिमित्ताने एका सामान्य चाहत्याला पहिल्यांदाच बिग बॉसचा खेळ खेळण्याची संधी मिळाली होती.

हेही वाचा : “ताई पैसे देतो, नाचून दाखवा…” ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच मेघा घाडगेचा योगेशवर गंभीर आरोप

त्रिशूलने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांबरोबर महेश मांजरेकर यांचेही मन जिंकले. ‘बिग बॉस’च्या चौथ्या सिझनच्या रंगलेल्या पहिल्या चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी त्रिशूलचे भरभरून कौतुकाही केले. पण नंतरच्या काही दिवसात त्रिशूल मागे पडलेला दिसला. खेळातील त्याचा सहभागही कमी झाला. त्यामुळे त्याला घराबाहेर पडावे लागले. त्रिशूलच्या घराबाहेर जाण्याच्या बातमीने सर्वच स्पर्धकांना वाईट वाटले. “एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावं लागत आहे,” असं म्हणत मांजरेकरांनी त्रिशूलचा निरोप घेतला.