scorecardresearch

Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल

‘तू तेव्हा तशी’ मालिकेमधील स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा इंटिमेट सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल
‘तू तेव्हा तशी’ मालिकेमधील स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा इंटिमेट सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिका सध्या प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता स्वप्निल जोशी व अभिनेत्री शिल्पा तुळसकर या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. सौरभ (स्वप्निल जोशी) व अनामिका (शिल्पा तुळसकर) यांच्या नात्यामध्ये मध्यंतरी फुट पडली होती. अनामिकाच्या नवऱ्याची (अशोक समर्थ) एंट्री झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाने वेगळं वळण घेतलं. आता पुन्हा एकदा सौरभ-अनामिका एकत्र आले आहेत. या दोघांचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर होतं अन्…” स्वप्निल जोशीसह इंटिमेट सीन करण्याबाबत शिल्पा तुळसकरचं वक्तव्य

सौरभ व अनामिकाने लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता मालिकेला एक रंजक वळण आलं आहे. ‘तू तेव्हा तशी’मध्ये सौरभ व अनामिका एकमेकांच्या अधिक जवळ आलेले दिसत आहेत. याचाच एक व्हिडीओ झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सौरभ व अनामिका यांचा इंटिमेट सीन पाहायला मिळत आहे. बेडवरील दोघांचा हा सीन अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. तर अनामिका सौरभला किस करत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – “माझा बॉयफ्रेंड होता तरीही…” अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा अफेअरबाबत खुलासा

मालिकेमध्ये सौऱभ व अनामिकाची केमिस्ट्री अधिक फुलत असताना हा व्हिडीओ पाहून मात्र काही प्रेक्षकांनी नकारात्मक कमेंट केल्या आहेत. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून मालिका बघतात आणि तुम्ही हे दाखवता, अशा मालिका बंद झाल्या पाहिजेत अशा अनेक कमेंट हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 11:08 IST

संबंधित बातम्या