झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील अधिपती व अक्षराची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. दरम्यान, या मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट बघायला मिळतात. त्यामुळे येणाऱ्या भागात नवीन काय बघायला मिळणार याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते?

दरम्यान, ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. गेल्या भागात भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून अधिपती अक्षराला घराबाहेर काढतो असं दाखवण्यात आलं होतं. आता नुकताच या मालिकेच्या नव्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अधिपतीचे वडील चारूहास अधिपतीला समजावताना दिसत आहेत. ते म्हणतात, “आई आपल्या मुलाच्या पंखात बळ भरते, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून मिंधा करून ठेवत नाही, तुझ्या आईच्या सांगण्यावरून तू तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं आहेस, हे तू मान्य कर”, असं सांगत अधिपतीला भुवनेश्वरीचा खरा चेहरा दाखण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा- दिवंगत ऋतुराज सिंह यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत, मित्राने दिली माहिती; निधनाचा घटनाक्रमही सांगितला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेचा हा नवा प्रोमो प्रेक्षकांना आवडलेला दिसून येत नाहीये. या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी अधिपतीला ट्रोलही केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले, आता मालिका कंटाळवाणी वाटायला लागली आहे; तर दुसऱ्याने लिहिले, “अधिपतीला मानसिक तज्ज्ञाकडे घेऊन जायला हवं, तेच नीट उपचार करतील.” तिसऱ्याने “तरीही नाही ऐकणार तो बैल, आता ही सीरिअल बोअर होत आहे. ती अक्षरा नेहमी रडत असते”, अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “अधिपतीला एवढीपण अक्कल नाहीये, बायकोवर विश्वास नाहीये याचा अर्थ किंवा चुकीच्या गोष्टींना समर्थन करतोय असे दिसून येतेय”, अशी कमेंट केली आहे; तर काहींनी या मालिकेची तुलना अनिल कपूरच्या ‘बेटा’ चित्रपटाबरोबर केली आहे.