scorecardresearch

“ती मुलगी माझी…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येवर कथित बॉयफ्रेड शिझानच्या आईची प्रतिक्रिया

तुनिषाने कथित बॉयफ्रेंड शिझान खानशी ब्रेकअप झाल्यामुळेच आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली

“ती मुलगी माझी…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येवर कथित बॉयफ्रेड शिझानच्या आईची प्रतिक्रिया
(फोटो सौजन्य- तुनिषा शर्मा इन्स्टाग्राम)

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर तिचा कथिक बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी शिझानवर गंभीर आरोप केले आहेत. तुनिषाच्या आत्महत्येसाठी शिझानच जबाबदार असल्याचं तिच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. अशातच आता तुनिषाच्या आत्महत्येवर शिझानच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

तुनिषाच्या आत्महत्येनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे या प्रकरणात तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानवर गंभीर आरोप करण्यात आलेत. शिझानला अटक करून रविवारी कोर्टासमोर हजर केलं, त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर ‘एबीपी न्यूज’शी बोलताना शिझानच्या आईने तुनिषा मला माझ्या मुलीप्रमाणेच होती असं म्हटलं आहे.

आणखी वाचा- लग्नानंतर कुंकू न लावल्यामुळे देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणतात “तू पुढची तुनिषा शर्मा…”

शिझानची आई म्हणाली, “तुनिषा खूप गोड मुलगी होती. ती मला माझ्या मुलीसारखीच होती. यापेक्षा जास्त काही मी बोलू शकत नाही. पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि शिझानही पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करत आहे. जे काही सत्य असेल ते शेवटी समोर येणारच आहे. तुम्ही समजू शकता की ही खूप मोठी घटना आहे.” एवढं सांगितल्यानंतर शिझानच्या आईने यानंतर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला आणि पोलिसांच्या तपासाला सहकार्य करण्याची विनंती केली.

आणखी वाचा- तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिझानच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “तो…”

दरम्यान अवघ्या २० वर्षांच्या तुनिषाने ‘अलिबाबा’ मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्येच गळफास घेतला. तुनिषाने कथित बॉयफ्रेंड शिझान खानशी ब्रेकअप झाल्यानंतर १५ दिवसांनी आत्महत्या केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात शिझानला पहिला आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. तुनिषाच्या निधनानंतर तिचा मित्रपरिवार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपलं दुःख व्यक्त करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 12:58 IST

संबंधित बातम्या