Vadalvaat Fame Actor Dr. Vilas Ujawane Passes Away : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं शुक्रवारी ( ४ एप्रिल ) दीर्घ आजाराने निधन झालं. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. विलास उजवणे ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ते घराघरांत पोहोचले. साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. या आजाराचा सामना करताना त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं. ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत असतानाच विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता. त्यातच त्यांना कावीळची देखील लागण झाली आहे. या सगळ्या उपचारांसाठी त्यांनी आपली आयुष्यभराची मिळकत खर्च केली होती. आजारपणात त्यांच्याकडे कामंही नव्हतं.

मात्र, या कठीण काळातून ते बाहेर पडले. मोठ्या धीराने त्यांनी या गंभीर आजाराशी लढा दिला आणि मनोरंजनविश्वात पुन्हा कमबॅक सुद्धा केलं होतं. ‘कुलस्वामिनी’, ‘२६ नोव्हेंबर’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने पोस्ट शेअर करत डॉ. विलास उजवणे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जवळपास ११० चित्रपट, विविध १४० मालिका याशिवाय व्यावसायिक नाटकांचे त्यांनी साधारण ३ हजारांहून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं आहे.

अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती पुन्हा खालावली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
dr vilas ujawane passed away
सिद्धार्थ जाधवची पोस्ट
dr vilas ujawane passed away
गौरव मोरेची पोस्ट

डॉ. विलास उजवणे यांचा प्रवास…

डॉ. विलास उजवणे यांचा जन्म १६ डिसेंबर १९६४ रोजी नागपूर येथे झाला. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं. शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात त्यांनी एकांकिकांमध्ये काम केलं होतं. त्यानंतर ते पुण्यात स्थलांतरित झाले. पुण्यात व्यावसायिक नाटकांमध्ये काम केल्यावर ते मुंबईत आले आणि याच ठिकाणी त्यांचा मालिकाविश्वातील प्रवास सुरू झाला. २०२२ मध्ये त्यांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.