Paaru Upcoming Twist: कमी शिकलेली, धाडसी, प्रसंगावधान राखणारी तितकीच प्रेमळ पारू ही आज घराघरांत पोहोचली आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या पारू मालिकेतील सर्वच कलाकारांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
‘पारू‘ मालिकेत दाखविल्याप्रमाणे मारुती किर्लोस्करांच्या घरात वर्षानुवर्षे काम करतो. त्याची मुलगी पारू सुद्धा किर्लोस्करांच्या घरात काम करते. पारूचा अहिल्यादेवी किर्लोस्करवर खूप विश्वास आहे. अहिल्याला ती देवी मानते. तिच्या शब्दाखातर ती काहीही करायला तयार होते. विशेष म्हणजे अहिल्यादेवीचा आणि दामिनी वगळता इतर किर्लोस्कर कुटुंबियांचादेखील तिच्यावर विश्वास असल्याचे पाहायला मिळते.
पारूला करावा लागणारा मृत्यूचा सामना
या सगळ्यात पारू व आदित्य एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पारू आदित्य व त्याच्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार होते. आता तिच्यावर मृत्यूचे संकट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पारू’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की गुरुजी पारूला सांगतात की या घरावरची संकटं दूर करण्यासाठी मी महामृत्यूंजय यज्ञ करणार आहे. त्यानंतर गुरूजी किर्लोस्करांच्या घरी पूजा करताना दिसतात. पूजा करताना ते अहिल्याला सांगतात की तुम्हाला पारूच्या घरी जाऊन तिच्या देवघरातील कलशामधील पाणी आणावं लागेल. पुढे पाहायला मिळते की गुरूजी पारूला सांगतात की घरावरचं संकट टाळायचं असेल तर तुला मृत्यूचा सामना करावाच लागेल.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, पारू कसा करणार मृत्यूचा सामना अशी कॅप्शन दिली आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, याआधीदेखील अनेकदा पारूने धाडसाने किर्लोस्करांवर आलेल्या संकटांना तोंड दिले आहे. त्यांना मोठमोठ्या संकटातून वाचवले आहे. पारूने नेहमीच स्वत:चा विचार न करता आधी किर्लोस्कर कुटुंबियांचा विचार केला आहे.
आता पारू मालिकेत नेमके काय घडणार, पारूवर मृत्यूचे संकट का आणि कसे येणार, आदित्य पारूला यातून वाचवू शकणार, पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.