९०च्या दशकात जन्मलेल्या आणि या काळात वाढलेल्या मुलांसाठी ‘अंडरटेकर’ हे नाव काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ‘डेडमॅन’ या नावाने प्रसिध्द असलेला WWE सुपरस्टार अंडरटेकरने अलिकडेच WWE रिंगमधून निवृत्ती घेतली. परंतु त्याच्या निवृत्तीमुळे नाराज झालेल्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. अंडरटेकरची गेल्या ३० वर्षांची कारकिर्द दाखवणारी एक शॉट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या फिल्मची जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही भारतीय जाहिरात पाहून अंडरटेकरही भावूक झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

५५ वर्षीय अंडरटेकरने आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चकित करणाऱ्या मॅचेस जिंकल्या आहेत. आक्रमक शैली आणि डेडमॅन गिमिकमुळे तो WWE मधील आजवरचा सर्वाधिक लोकप्रिय रेसलर म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या करिअरमध्ये खेळलेल्या विविध मॅचेस, त्याचं बालपण, करिअरची सुरुवात कशी झाली? या सर्व गोष्टी या फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहेत. या फिल्मची एक भारतीय जाहिरात सध्या चर्चेत आहे. ही जाहिरात पाहून अंडरटेकरही भावूक झाला. तुमचं प्रेम पाहून मी नेहमीच चकित होतो अशा आशयाचं ट्विट करुन त्याने भारतीय चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – ‘बॉण्ड गर्ल’च्या पहिल्या बिकिनीचा होतोय लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क

खऱ्या आयुष्यात कसा आहे अंडरटेकर?

अंडरटेकरचं खरं नाव मार्क कॅलवे आहे. २४ मार्च १९६५ ला त्याचा जन्म अमेरिकेत टेक्सासमध्ये झाला होता. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये त्याने ‘स्पोर्टस मॅनेजमेंट’चं शिक्षण घेतलं. त्याला खेळांची प्रचंड आवड होती. युरोपमध्ये प्रोफेशनल फुटबॉल खेळण्याची त्याची इच्छा होती पण आपला निर्णय बदलत त्याने कुस्तीपटू व्हायचं ठरवलं. १९८४ पासून आपल्या कुस्तीच्या करिअरला सुरूवात करणाऱ्या अंडरटेकरने आता ३० वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर आता निवृत्त व्हायचं ठरवलंय. आता तो त्याच्या चार मुलांसोबत छान आयुष्य जगणार आहे. त्याच्या निवृत्तीमुळे WWEमधला आणखी एक आयकॉन अॅक्टिव्ह रेसलिंगपासून दूर गेलाय हे नक्कीच.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The dead man undertaker completed 30 years in wwe mppg
First published on: 20-10-2020 at 14:32 IST