‘द कपील शर्मा शो’मध्ये कपीलची पत्नी म्हणून अनेकदा दिसणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचे काही फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. सुमोनानेच इन्स्टाग्राम आपल्या थायलंड दौऱ्यामधील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये समोना बिकिनीमध्ये समुद्रकिनारी आराम करताना दिसत आहे.
सुमोना सध्या थायलंडमधील फुकेत येथे सुट्ट्यांसाठी गेली आहे. सुमोना इन्स्टाग्राम प्रचंड अॅक्टीव्ह असून अनेकदा ती सेटवरचे फोटोही पोस्ट करताना दिसते. असेच तिने थायलंडमधील फोटोही शेअर केले आहेत. ‘द कपील शर्मा शो’मध्ये कायमच सोज्वळ भूमिका साकारणारी सुमोना या फोटोंमध्ये चक्क बिकीनी लूकमध्ये दिसत आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिच्या उजव्या पायावरील आकर्षक टॅटूही दिसत असून तिच्या अनेक फॉलोअर्सने या टॅटू संदर्भात कमेंट केल्या आहेत.
सुमोनाने पोस्ट केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये ती स्वीमींग पूलमध्ये असल्याचे दिसत आहे.
सुमोनाने अशाप्रकारे बिकीनीमधील फोटो शेअर करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही तिने अशाप्रकारचे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
श्रीलंकेमध्ये फिरायला गेली असतानाही तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता.
आमीर खान आणि मनिषा कोईरालाच्या लोकप्रिय ‘मन’ सिनेमामध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या सुमोनाने बर्फी, किक यासारख्या सिनेमांमध्येही काम केले आहे. सिनेमानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली. ‘कसम से’ मालिकेपासून आपल्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला सुरुवात करणारी सुमोना ‘कस्तुरी’, ‘नीर भरे तेरे नैना देवी’, ‘सपनो से भरे नैना’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘कहानी कॉमेडी सर्कस की’, ‘कॉमेडी नाईट्स वीथ कपील’, ‘ये है इश्कीया’, ‘जमाई राजा’, ‘देव’ या मालिकांमध्ये दिसली.