कपिल शर्माच्या ‘या’ प्रश्नांमुळे गोविंदाची झाली बोलती बंद

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गोविंदा आणि पत्नी सुनीताने हजेरी लावली होती.

kapil-sharma
Photo-Sony Tv/ Instagram

‘द कपिल शर्मा’ शो हा सोनी टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो पैकी एक आहे. या शो मध्ये प्रत्येक वेळेस वेगवगेळे सेलिब्रेटी हजेरी लवतात. यावेळच्या एपिसोडमध्ये कपिल शर्माने गोविंदाने, पत्नी सुनीताने हजेरी लावली होती. कपिलने या भागात गोविंदाला पत्नी बद्दल असे काही प्रश्न विचारले ज्यामुळे त्याची बोलती बंद झाली.

कपिलने शोच्या दरम्यान गोविंदाला विचारलं की, ‘त्याच्या पत्नीने कोणत्या रंगाचे कानातले घातले आहेत? ‘कोणत्या रंगाचे नेल-पॉलिश लावले आहे?’ कपिलचे हे प्रश्न ऐकून गोविंदाने कपिलला विचारले की तू नक्की माझी वाट लावणार आहेस. कारण गोविंदा कपिलच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. तसंच पत्नी सुनीताची रिएक्शन सुद्धा पाहण्या सारखी होती. गोविंदाचे हे उत्तर ऐकून सुनीताला खुप मोठा धक्का बसला आणि तिने कपिलला सांगितलं, “तु याला काय विचारते आहेस, मला विचार मी तुला इथंभूत माहिती देते.” सुनीताचे हे उत्तर ऐकून कपिल शर्मा, अर्चना पूरन सिंह आणि गोविंदा त्यांचे हसू आवरू शकले नाहीत.

दरम्यान या भागात गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकने त्याच्यांत सुरू असलेल्या वादामुळे त्याने काम करण्यास नकार दिला. या विषयी बोलताना त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, “गेल्या १५ दिवसांपासून माझा रायपुर ते मुंबई सतत प्रवास सुरू आहे. मी कपिल शर्मासाठी माझ्या डेट्स दिलेल्या असतात. मात्र जेव्हा मला कळलं की शो मध्ये ते (गोविंदा आणि सुनीता) येणार आहेत तेव्हा असूनही सुद्धा मी माझ्या डेट्स अॅडजस्ट केल्या नाहीत. कारण मला त्यांच्या सोबत काम करायचे नव्हते.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The kapil sharma show host kapil sharma ask question to govinda about his wife aad