‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘एक टप्पा आऊट’च्या १२ जुलैच्या एपिसोडमध्ये अभिनेता अंकुश चौधरी हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमात परीक्षकाची धुरा सांभाळणाऱ्या भरत जाधवला खास सरप्राइज देण्यासाठी अंकुशने या मंचावर हजेरी लावली. अंकुश आणि भरत जाधवची अगदी जुनी मैत्री. लालबाग-परळमध्ये या दोघांचंही बालपण गेलं. गल्लीबोळातल्या छोट्या मोठ्या एकांकिकांपासून ते अगदी सिनेमापर्यंतचा प्रवास दोघांनी एकत्रच केला. दोघांमधली मैत्री अधिक घट्ट होत गेली. या प्रवासात अनेक चांगल्या वाईट आठवणी आहेत. ‘एक टप्पा आऊट’च्या मंचावर अंकुश आला आणि या आठवणींना उजाळा मिळाला. आठवणीतले किस्से सांगताना भरतलाही अश्रू अनावर झाले.
'भरत जाधव' यांना special surprise देण्यासाठी आला आहे त्यांचा खास दोस्त superstar 'अंकुश चौधरी'…
Wildstone आणि Sunsilk प्रस्तुत "एक टप्पा आऊट"
शुक्र.१२ जुलै रा. ८ वा. Star प्रवाह वर.#EkTappaOut #StarPravah #EkTappaOutOnStarPravah@imAnkkush pic.twitter.com/jtwBa2M9Dn— Star Pravah (@StarPravah) July 10, 2019
भरत जाधव यांचं ‘मोरुची मावशी’ नाटकंही तुफान गाजलं. अंकुशने फर्माईश केल्यानंतर भरतने या नाटकातल्या सुप्रसिद्ध ‘टांग टिंग टिंगा’वर ताल धरुन एपिसोडची रंगत आणखी वाढवली. ‘एक टप्पा आऊट’च्या स्पर्धकांसाठी हा अविस्मरणीय अनुभव ठरला. हा कार्यक्रम नुकताच सुरू झाला असून संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम कॉमेडीचा बादशहा जॉनी लिव्हर आणि मराठीतले दोन दिग्गज कलाकार अर्थातच निर्मिती सावंत आणि भरत जाधव करत आहेत.