बॉलिवूडचा अॅक्शन किंग टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांचं नेहमी एकमेकांसोबत नाव जोडलं जातं. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर हे दोघं एकमेकांच्या फोटो व व्हिडीओवर कमेंटसुद्धा करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का की टायगरच्या आधी दिशाचं नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं. तो छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता असून ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतो. त्या अभिनेत्याचं नाव आहे पार्थ समथान.

टायगरच्या आधी दिशा पार्थला डेट करायची असं म्हटलं जातं. हो दोघं जवळपास एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यानंतर दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला. त्यांच्या ब्रेकअपचं कारण होता एक निर्माता. ‘बिग बॉस’ फेम विकास गुप्ता आणि पार्थ रिलेशनशिपमध्ये आणि ही गोष्ट जेव्हा दिशाला समजली तेव्हा तिने ब्रेकअप केला असं म्हटलं जातं. मात्र पार्थने हे आरोप फेटाळले आहेत. विकासने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा आरोप पार्थने केला. तर विकासनेही पार्थचे आरोप फेटाळले होते. पार्थ माझ्याकडे नेहमी पैसे मागतो आणि पैसे नाही दिले तर तो असे बिनबुडाचे आरोप करतो, असं तो म्हणाला.

पाहा व्हिडीओ : जेव्हा अजयला मारण्यासाठी जमावाने घातला होता घेराव

काही दिवसांपूर्वीच दिशा व पार्थचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दिशा पटानी हे आता बॉलिवूडमधील परिचित नाव झालं आहे तर पार्थसुद्धा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. आता पार्थ ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील नायिका एरिका फर्नांडिस हिला डेट करत असल्याचं समजतंय.