बॉलिवूड म्हटलं की कलाकार आणि त्यांच्या विषयीच्या विविध चर्चा आल्याच पाहिजेत. या  लखलखत्या दुनियेत नक्की घडतंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी सर्वचजण उत्सुक असतात. थोडक्यात काय तर गॉसिप सर्वांनाच हवेहवेसे वाटते. गॉसिप… मग ते कसेही असो आणि ते कोणाबद्दलही असो. पण, नेमके हे गॉसिप जाणून घेण्यासाठी अनेकांचीच धडपड सुरु असते. या गॉसिपिंगपासून अभिनेत्री करिना कपूरही दूर नाही असेच म्हणावे लागेल. विविध कारणांनी आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने एकमेकांसमोर येणारे, एकमेकांना भेटणारे हे कलाकार आणि त्यांच्यामध्ये होणारी चर्चा याबद्दल खुद्द करिनासुद्धा उत्सुक आहे हे एका व्हिडिओमुळेच सध्या स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान बेगम करिना कपूर प्रसारमाध्यमांसोबत बोलतानाचा हा व्हिडिओ आहे. कोणा एका कार्यक्रमादरम्यान मुख्य विषयाला सोडून, त्यापासून भरकटत जाऊन स्वत:च्याच गप्पा मारण्याची आणि कोण भेटलं की गॉसिपिंग करण्याची ही करिनाची काही पहिलीच वेळ नव्हती. त्यामुळेच का असेना… पण तिला बॉलिवूडची गॉसिप क्वीन म्हटलं जातं. करिनाचा हाच दिलखुलास स्वभाव आणि या हटके गुणामुळेच ती अनेकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे हे मात्र नक्की.

प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तेर देत असतानात करिनाला आमिर खानच्या पत्नीने म्हणजेच किरण रावने पाहिले आणि ती करिनाला भेटायला आली. किरण आणि करिनाची गळाभेट होताच त्यानंतर या दोघीही गप्पांमध्ये इतक्या रंगल्या की त्यांचे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांकडेही लक्ष राहिले नाही. यादरम्यानच करिनाने एक आई म्हणून किरण रावचे फारच कौतुकही केले. अवघ्या काही मिनिटांसाठी या दोघींनीही प्रसारमाध्यमांकडे नजर टाकली आणि पुन्हा कोण, कुठे, कधी…. असे प्रश्न विचारत करिनाचे गॉसिपिंग इथेही सुरु झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अभिनेत्री करिना कपूर सध्या तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. गरोदरपणाची बातमी आल्यापासून ते अगदी आताच्या घडीपर्यंत करिना सर्वतोपरी तिचे गरोदरपण एन्जॉय करत आहे असेच म्हणावे लागेल. चित्रपट म्हणू नका, फॅशन शो म्हणू नका किंवा मग सेलिब्रिटी पार्ट्या म्हणू नका. करिना या सर्वच ठिकाणी आवर्जून हजेरी लावत आहे. नुकतेच फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्येही एका काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये करिना सुरेख दिसत होती. अनेकांच्या नजरा या ‘टू बी मम्मा’ वर खिळल्या होत्या. इतकेच नव्हे तर विविध फोटोशूटच्या निमित्ताने समोर येणारे करिनाचे काही ग्लॅमरस फोटो आणि गरोदरपणातही तिचा काम करण्याचा उत्साह पाहून अनेकजण तिची प्रशंसा करत आहेत अभिनेत्री करिना कपूरने तिच्या वागण्यातून आणि कृत्यातून चित्रपटसृष्टीमध्ये आजवरचा एक वेगळाच आदर्श घातला आहे असे म्हणायला हरकत नाही. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत ते म्हणजे करिनाच्या होणाऱ्या बाळाकडे. त्यामुळे सैफिनाच्या कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण करणारा एक दुवा काही दिवसांतच त्यांच्या जीवनात येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This video proves that no one beats kareena in gossiping
First published on: 10-12-2016 at 08:19 IST