आपल्या आगामी ‘बागी’ या चित्रपटासाठी टायगर श्रॉफ फार उत्साहात आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यामुळे टायगर आणि श्रद्धा या चित्रपटाच्या प्रसिद्धीत सध्या व्यस्त झाले आहेत. दरम्यान, आपला खरा ‘टायगर’ आणि श्रद्धाची भेट घडवून देण्याची टायगरची इच्छा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ लवकरचं श्रद्धाची त्याच्याकडे असलेल्या वाघाशी भेट घडवून आणणार आहे. टायगरकडे असलेल्या वाघाचे नाव ‘ली’ असे आहे. टायगर २०१४ साली त्याच्या हिरोपंती या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नागपूरला गेला होता. तेव्हा त्याने तेथील एका प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या बछड्याला दत्तक घेतले. या वाघाचा संपूर्ण खर्च स्वतः टायगर करतो. तसेच, आपला आवडता कलाकार असलेल्या ब्रुस ली याला श्रद्धांजली म्हणून त्याने या वाघाचे नाव ‘ली’ असे ठेवले.
वेळ मिळताच आपण श्रद्धाला ‘ली’ ला भेटवण्यासाठी नागपूरला नेणार असल्याचे टायगरने म्हटले आहे. श्रद्धा आणि टायगरची प्रमुख भूमिका असलेला बागी येत्या २९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2016 रोजी प्रकाशित
‘त्या’ मित्राची आणि श्रद्धाची टायगर घडवणार भेट
यासाठी श्रद्धाला नागपूरला नेणार असल्याचे टायगरने म्हटले.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 26-04-2016 at 12:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger shroff and shraddha kapoor will visit to nagpur to meet real tiger lee