‘उतरण’ या लोकप्रिय मालिकेतून ‘इच्छा’ही भूमिका साकारत अभिनेत्री टिना दत्ताने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. तिच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. सध्या टिना दत्ताने छोट्या पडद्यावरुन ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर टिना ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अनेकदा या बोल्ड फोटोंमुळे टिना दत्ता चर्चेत आली आहे.
टिना दत्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटोशूटमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे टिना दत्ता ट्रोल झाली आहे. या फोटोत टिना दत्ता भाजी मार्केटमध्ये बसल्याचं दिसून येतंय. तिच्या आजूबाजूला अनेक भाज्या दिसत आहेत. तर टिनाच्या समोर देखील एक तराजू दिसतोय. भाजी मार्केट मध्ये केलेल्या या फोटोशूटमुळे टिना दत्ता नेटिझन्सच्या निशाण्यावर आली आहे. “कहाण्यांमध्ये आणि मुंबईच्या रस्त्यांवरील या रंगांमध्ये रमले आहे. हे असं एकमेव शहर आहे जे सर्वांची स्वप्न पूर्ण करतं. इथे प्रत्येकाची एक कहाणी आहे,” असं टिना कॅप्शनमध्ये म्हणाली आहे.
View this post on Instagram
मात्र टिना दत्ताने फोटोशूटसाठी निवडलेलं हे लोकेशन मात्र काही नेटकऱ्यांना आवडलेलं दिसत नाही. अनेकांनी भाजीवाली म्हणत तिची थट्टा केली आहे. एक युजर टिनाच्या या फोटोवर कमेंट करत म्हणाला, “मॅडम टोमॅटो कशा भावाने दिले?” तर दुसरा म्हणाला “भाजीवाली बाई आली भाजी घ्या लोकांनो”. तर आणखी एक युजर म्हणाला “तू भाजीवाली झालीस”.

टिनाच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी तिला “टोमॅटो कसे दिले” अशा कमेंट करत तिची थट्टा केली आहे. ट्रोल होण्याची टिना दत्ताची ही काही पहिली वेळ नव्हे .याआधी देखील एका टॉपलेस फोटोमुळे टिना चांगलीच चर्चेत आली होती. या टॉपलेस फोटो वरून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.