हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रुज आपल्या धमाकेदार अॅक्शन सीन्ससाठी ओळखला जातो. ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपट मालिकेत त्याने केलेले स्टंट पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. या मालिकेतील सातवा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या ब्रिटनमधील ऑक्सफोर्डशायर येथे सुरु आहे. दरम्यान टॉम क्रुजने केलेल्या एका स्टंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे एका धावत्या बुलेट ट्रेनवर बसून त्याने हा खतरनाक स्टंट केला आहे.

अवश्य पाहा – १० कलाकार अन् दिवस १००; पाहा ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी होणारे स्पर्धक

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

‘मिशन इम्पॉसिबल’ ही एक गुप्तहेर चित्रपटांची सीरिज आहे. या चित्रपटांची कथा इथर हंट या अमेरिकन गुप्तहेराभोवती फिरते. ही व्यक्तिरेखा अभिनेता टॉम क्रुज याने साकारली आहे. खरं पाहाता ही सीरिज अगदी जेम्स बॉण्डसारखीच आहे. परंतु यामध्ये बॉण्ड चित्रपटांपेक्षाही अधिक खतरनाक स्टंट्स पाहायला मिळतात. लक्षवेधी बाब म्हणजे हे सर्व स्टंट चित्रपटातील कलाकार स्वत:च करतात. किंबहुना स्टंट करण्याची तयारी असलेल्या कलाकारांनाच या चित्रपटात झळकण्याची संधी मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मिशन इम्पॉसिबल’ सीरिजच्या चौथ्या भागात बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर झळकले होते. या चित्रपटाचं नाव ‘मिशन इम्पॉसिबल: घोस्ट प्रोटोकॉल’ असं होतं. या चित्रपटात अनिल कपूर यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यामुळे ‘मिशन इम्पॉसिबल’ फ्रेंचाईजी आता भारतातही खूप लोकप्रिय झाली आहे. दरम्यान टॉम क्रूसने केलेल्या या नव्या स्टंटमुळे प्रेक्षक आता या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.