‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला. जगात सौंदर्य स्पर्धांपैकी एक महत्त्वाची आणि सर्वांत लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तब्बल १७ वर्षांनंतर भारताच्या सौंदर्यवतीने बाजी मारली. हा किताब पटकावणारी मानुषी सहावी भारतीय महिला ठरली. विशेष म्हणजे यापूर्वी हा किताब जिंकलेल्या रिटा फारिया, ऐश्वर्या राय आणि आता मानुषीमध्ये एक योगायोग जुळून आला आहे. हा योगायोग आहे तारखांचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ नोव्हेंबर १९६६ रोजी रिटा फारिया या भारतीय तरुणीने ‘मिस वर्ल्ड’चा किताब आपल्या नावी केला होता. हा किताब पटकावणारी रिटा पहिली भारतीय आणि आशियाई महिला आहे. त्यानंतर १९ नोव्हेंबर १९९४ मध्ये ऐश्वर्या रायने ‘मिस वर्ल्ड’चा मुकुट पटकावला. आणि शनिवारी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०१७ रोजी हरयाणाच्या मानुषी छिल्लरने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘मिस वर्ल्ड २०१७’चा किताब आपल्या नावे केला. या तिघींनी स्पर्धा ज्या तारखांना जिंकली, त्या १७, १८ आणि १९ नोव्हेंबर अशा आहेत आणि हाच अनोखा योगायोग आहे.

मिस वर्ल्ड स्पर्धेचं ‘डेट कनेक्शन’

VIDEO : जेव्हा कतरिना करते सलमानची कॉपी

…अन् करण जोहरचे डोळे पाणावले

दीपिकाला जिवंत जाळणाऱ्यांना एक कोटींचे बक्षीस, क्षत्रिय महासभेची धमकी

…अन् ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला

करणचा नवा ‘स्टुडण्ट’ प्रेक्षकांच्या भेटीला

‘धडक’मध्येही गुंजणार अजय-अतुलचे ‘अलगुज’ सूर?

मादक अभिनेत्री ते छोट्या पडद्यावरील आई, असा होता शिल्पा शिरोडकरचा प्रवास

चित्रपट निर्मात्यांना मिळणाऱ्या धमक्यांवर सरकार गप्प का?- श्याम बेनेगल

IFFI 2017: इफ्फीतही पद्मावतीच्याच चर्चांचा घूमर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 news form miss world date connection to iffi 2017 bollywood marathi gossip news
First published on: 21-11-2017 at 12:03 IST