Horror Movies On OTT : हॉरर चित्रपट नेहमीच पसंत केले जातात, आजकाल कॉमेडी हॉरर चित्रपट ट्रेंडमध्ये आहेत, परंतु काही चित्रपट असे आहेत, जे तुम्हाला भीतीच्या भोवऱ्यात घेऊन जातात.

काही हॉरर चित्रपट असे असतात की ते चुकून एकट्यानं पाहिले तर मग सगळं संपलंच म्हणून समजा. जर तुम्ही रात्री चुकून हॉरर चित्रपट पाहिला, तर भीतीमुळे तुम्हाला साधी झोपही येत नाही.

आता या हॉरर चित्रपटांमध्ये कॉमेडी मसाला जोडला जातो, ज्यामुळे चित्रपटातील हॉरर दृश्यांवर कमी आणि कॉमेडीवर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. पण, पूर्वीचे हॉरर चित्रपट फक्त आणि फक्त भीतीनंच भरलेले असायचे. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला त्या हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही एकट्यानं पाहूच शकणार नाही.

आज आम्ही तुमच्यासाठी अशा चार हॉरर चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत, जे तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर घरी बसून पाहू शकता. साऊथ चित्रपटसृष्टीत सस्पेन्स आणि मिस्ट्री थ्रिलर चित्रपट मोठ्या प्रमाणात बनवले जातात, तिथे हॉरर चित्रपटांवरही बरेच प्रयोग केले गेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच चार हॉरर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटांमध्ये एक जबरदस्त क्लायमॅक्स आहे, ज्याचा तुम्हाला संपूर्ण चित्रपटात अंदाजही येणार नाही.

अरुंधती एक अनोखी कहानी (२००९)

‘अरुंधती’ हा तेलुगू चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला. हा हॉरर थ्रिलर चित्रपट एका महिलेबद्दल आहे. चित्रपटात अलौकिक घटना आणि शक्तिशाली दृश्ये आहेत. अनुष्का शेट्टी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. IMDb वर चित्रपटाचे रेटिंग ७.४/१० आहे. तुम्ही तो प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.

अरुंधती (२०१४)

२०१४ मध्ये अरुंधती नावाचा एक हॉरर चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये कोएल मलिक मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओसह जिओ हॉटस्टारवरदेखील उपलब्ध आहे. या चित्रपटाला IMDb वर ५.२/१० रेटिंग मिळाले आहे.

भागमती (२०१८)

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भागमती’ या तेलुगू चित्रपटात अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा एका महिलेची आहे, जी एका भूतबाधा झालेल्या हवेलीत कैद होते आणि नंतर हळूहळू भयानक रहस्ये उघड होतात. या चित्रपटाला IMDb वर ७.०/१० रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवरदेखील मोफत उपलब्ध आहे.

यावरुम नलम (१३बी) (२००९)

२००९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘यावरुम नलम’ हा एक तामिळ भयपट आहे. ही कथा एका कुटुंबाची आहे, ज्यांचे आयुष्य एका टीव्ही शोशी विचित्रपणे जोडले जाते. हा चित्रपट हिंदीमध्ये १३ बी म्हणून प्रदर्शित झाला आहे. आयएमडीबीवर या चित्रपटाला ७.४/१० रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटात आर. माधवन मुख्य भूमिकेत आहे. ‘यावरुम नलम’ म्हणजे ‘सर्व काही ठीक आहे.’ तुम्ही हा हॉरर चित्रपट प्राइम व्हिडीओवरदेखील पाहू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.