scorecardresearch

VIDEO : “आमच्यावरील बलात्कार थांबवा”, विवस्त्र होत ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर घुसली महिला

कान्स चित्रपट महोत्सवामध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. या महोत्सवामधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Cannes Film Festival , 75th Cannes Film Festival
कान्स चित्रपट महोत्सवामध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. या महोत्सवामधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानला जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगत आहे. १७ मेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाचा २८मेला शेवटचा दिवस असणार आहे. कान्सच्या रेडकार्पेटवरील नट-नट्यांचे विविध लूक आपण पाहत आहोत. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सतत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या महोत्सवामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय?
कान्स चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपटाचं स्क्रिनिंग सुरु असताना एक महिला अचानक कान्सच्या रेड कार्पेटवर घुसली. इतकंच नव्हे तर यावेळी तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. हद्द म्हणजे ही महिला विवस्त्र होत रेड कार्पेटवरच घोषणाबाजी करू लागली. ती गुडघ्यावर बसून आरडाओरड करत होती. या महिलेने तिचं शरीर युक्रेनच्या झेंड्याच्या रंगाने रंगवलं होतं. तिच्या शरीराच्या मध्यभागावर “स्टॉप रेपिंग अस” (“Stop Rapping Us”) असं लिहिण्यात आलं होतं. तसंच पाठीवर SCAM हा शब्द लिहिण्यात आला होता. तसेच तिच्या शरीरावर हाताचे लाल रंगाचे ठसे देखील होते.

आणखी वाचा – “देशाला विभागू नका कारण…” बॉलिवूड विरूद्ध साऊथ वादावर अखेर अक्षय कुमारने सोडलं मौन

हॉलिवूड रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, विवस्त्र अवस्थेमध्ये ही महिला छायाचित्रकारांसमोर गुडघ्यावर बसून ओरडत होती. तिचा हा प्रकार पाहता तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी काळ्या रंगाच्या कोट तिच्या अंगावर दिला आणि तिथून त्या महिलेला बाहेर काढलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ kyle buchanan ह्याने त्याच्या ट्विट अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री कंगना रणौतला झटका, कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

अनोळख्या महिलेचा हा प्रकार पाहून उपस्थितही काही वेळासाठी बुचकाळ्यात पडले. युक्रेनमध्ये महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांविरोधात ही महिला आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होती. रशियन आणि युक्रेन या दोन देशांमध्ये निर्माण झालेली युद्ध परिस्थिती आजही सुरुच आहे. रशियन सैनिक युक्रेनियन महिलांवर अत्याचार करत असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Topless woman on red carpet in cannes film festival protests ukraine video viral on social media kmd

ताज्या बातम्या