scorecardresearch

…त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली : तृप्ती देसाई

यापूर्वी तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात इंदुरीकर महाराजांची किर्तने महिलांचा अपमान करणारी होती असे म्हटले होते.

…त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली : तृप्ती देसाई

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई सध्या बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. त्या बिग बॉसच्या घरात त्यांचे अनेक अनुभव सांगताना दिसत आहेत. दरम्यान, एकदा त्यांच्या पतीने त्यांची आरती ओवाळली होती असे म्हटले होते.

बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धक बसलेले असताना सोनाली पाटीलने तृप्ती देसाई यांना ‘तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रेरणा मिळाली की याच्या विरोधात आपण बोलले पाहिजे’ असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत तृप्ती म्हणाल्या, ‘मी देवाची भक्त आहे आणि एकदा मी माझ्या पतीसोबत जेवायला बसले होते. तेव्हा टीव्हीला बातमी सुरु झाली की एक कॉलेजची मुलगी चुकून चौथऱ्यावर गेली आणि दर्शन घेऊन खाली आली.’

आणखी वाचा : तृप्ती देसाईंना ‘बिग बॉस’चा आवाज पुरुषाचाच असल्याची अडचण; म्हणाल्या…

पुढे त्या म्हणाल्या, ‘चौथऱ्यावर कुणालाच प्रवेश नाही. ती खाली आल्यानंतर गोमुत्र आणि दुधाने अभिषेक घालून देव पवित्र केले गेले. बघताना मी म्हटलं मी तर शनिवारचा उपवास करायचे आणि मी देव मानते. मी म्हटलं असं कसं यांना आडवलं. आईच्या उदरातूनच देवाचा जन्म झाला ना. माझे पती तेव्हा मला म्हणाले की तू का शांत बसलेस म. तू देवाची भक्त आहेस ना. सुरुवात जी झाली ती पतीने प्रेरणा दिली. त्यानंतर त्यांनी मला खूप पाठींबा दिला. केरळला त्या दिवशी जाताना माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली होती की तू यशस्वी होऊन ये’ असे तृप्ती म्हणाल्या.

यापूर्वी तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात इंदुरीकर महाराजांची किर्तने महिलांचा अपमान करणारी होती असे म्हटले होते. ‘आमच्या आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची बरीचशी किर्तने यूट्यूबवरुन डिलिट केली गेली. म्हणजे जवळजवळ ८० टक्के किर्तने डिलिट केली’ असे तृप्ती म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2021 at 19:42 IST

संबंधित बातम्या