छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे अनेकांच्या जगण्याचा भाग झालेला असतो. त्यातच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेविषयी फार काही सांगायला नको. कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेली ही मालिका आज अनेकांच्या मनावर राज्य करत आहेत. अतिशय लाघवी आणि सोज्वळ स्वभावाच्या पाठक बाई आणि तितकाच रांगडा राणादा या जोडीने अनेकांना अक्षरश: वेड लावलं आहे. या दोघांची चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ आहे. त्यामुळे या दोघांविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. या मालिकेमध्ये राणादा ही व्यक्तीरेखा अभिनेता हार्दिक जोशी साकारत असून ही मालिका करण्यापूर्वी त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं आहे.

आज अनेक तरुणींच्या मनाचा ठाव घेणारा राणादा यापूर्वी अनेक हिंदी, मराठी मालिका तसंच बॉलिवूड चित्रपटांमध्ये साइड डान्सर म्हणून काम करायचा. विशेष म्हणजे अभिनेता अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये त्याने साइड डान्सर म्हणून काम केलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यातील एक फोटो त्याने फेसबुकवर शेअर करत ‘माय वर्क’ असं कॅप्शनही दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hardeek Joshi (@hardeek_joshi) on

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हार्दिकने ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.तसंच मकरंद अनासपुरेच्या ‘रंगा पतंगा’ चित्रपटात त्याने एसीपी पाठक नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. इतकंच नाही तर त्याने‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमातही छोटेखानी भूमिका केली आहे.