गेल्या कित्येक महिन्यांपासून देशावर करोनाचं सावट आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. यातच आता लोकप्रिय अभिनेता कुशल टंडनमध्येदेखील करोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्याने करोना चाचणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी कुशल टंडनमध्ये करोनाची लक्षणं आढळली होती. त्यामुळे त्याने करोना चाचणी केली. यात त्याचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. ही माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे. ट्विटरवर त्याने आपले रिपोर्ट्स शेअर केले आहेत.

“देवाच्या कृपेमुळे माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता २४ तारखेपासून पुन्हा काम करण्यास सज्ज झालो आहे. चित्रीकरणादरम्यान विशेष काळजी घेईन आणि नियमांचं पालन करेन”, अशी पोस्ट कुशलने केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुशलमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली होती. मात्र आता त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे तो आगामी शोच्या चित्रीकरणाकडे वळला आहे.
