अक्षय कुमारमुळे ट्विंकल खन्नाला झाली होती अटक; चारचौघांत करायला लावलं होतं ‘ते’ कृत्य

रॅम्प वॉक वेळी अक्षय कुमार ट्विंकल जवळ आला आणि त्याने तिला जीन्सचं बटन उघडण्याचा इशारा केला.

akshay-kumar-twinkle-khanna
(photo-instagram@twinklerkhanna)

बॉलिवूडमधील कूल कपल्स पैकी एक म्हणजे खिलाडी अक्षय कुमार आणि त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना. अक्षय कुमार फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. अक्षय आणि ट्विंकलच्या जोडीला चाहत्यांची देखील मोठी पसंती मिळताना दिसते. अक्षय आणि ट्विंकल खन्नाच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. १७ जून २००१ साली दोघांनी धूमधडाक्यात लग्न केलं होतं. लग्नाला अनेक वर्ष उलटून गेली असली तरी दोघांमध्ये आजही तितकचं प्रेम पाहायला मिळतं. पण तुम्हाला माहितेय का? अक्षय कुमारमुळे ट्विंकल खन्नाला एकेकाळी अटक झाली होती.

एका मुलाखतीत ट्विंकल खन्नाने तो जुना किस्सा शेअर केला होता. हा किस्सा मीडियातदेखील चांगलाच गाजला. एका फॅशन शो वेळीचा हा जुना किस्सा असून यावेळी अक्षय कुमार एका जीन्ससाठी रॅम्प वॉक करणार होता. यावेळी अक्षयने ट्विकलला काही सूचना दिल्या होत्या. या रॅम्प वॉकमध्ये अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाला त्याच्या जीन्सचं बटन उघडण्यास सांगितलं होतं.

akshay-kumar-ramp-walk
(photo-Indian Express Archive)

त्या जीन्सचं नावचं ‘अनबटन्ड’ असल्यानं अक्षयने हा हट्ट धरला. खरं तर ट्विकल खन्नाने असं करण्यास साफ नकार दिला होता. मात्र रॅम्प वॉक वेळी अक्षय कुमार ट्विंकल जवळ आला आणि त्याने तिला बटन उघडण्याचा इशारा केला.जेव्हा ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारच्या जीन्सचं बटन उघडण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिचा हाथ पकडून तिला बटन उघडण्यास भाग पाडलं.

हे देखील वाचा: अनुष्का शर्माचा नो मेकअप लूक व्हायरल, आईची ड्यूटी सांभाळत करतेय वर्कआउट

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

हे देखील वाचा: लिसा हेडनची बेबी शॉवर पार्टी, फुलांची सुरेख सजावट तर मेन्यू पाहून तोंडाला सुटेल पाणी

पुढे या मुलाखतीत ट्विकल खन्ना म्हणाली, “या रॅम्पवॉकच्या दुसऱ्या दिवशीच अक्षयला पद्मश्री सन्मान मिळणार होता. त्यासाठी आम्ही राष्ट्रपती भवनात पोहचलो. तिथे पोहचताच मला आई डिंपकल कापडियाचा मेसेज आला की, पोलिसांकडे तुझं अरेस्ट वॉरंट आहे आणि ते तुला शोधत आहेत.” असं ती म्हणाली. एवढचं नाही तर ही केस अजूनही सुरु असल्याचं ट्विंकल म्हणाली होती.

तर या प्रकरणी ट्विंकल खन्नाला एकटीलाच दोषी ठरवण्यात आलं होतं.  ५०० रुपये दंड भरून ट्विंकलला नंतर जामिन मंजूर झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twinkle khanna got arrested once as she unbuttoned akshay kumar jeans in fashion show kpw

ताज्या बातम्या