अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल नेटवर्किंगवर उघडपणे आपली मत मांडत असते. अनेक लहान लहान गोष्टींसंदर्भात तिची निरीक्षणशक्ती आणि मजेदार वक्तव्य करण्याची पद्धत अनेकांना आवडते. तिच्या याच मतप्रदर्शनामुळे अनेकदा ती बातम्यांमध्ये दिसते. सध्या अभिनय क्षेत्रामध्ये फारशी न दिसणारी ट्विंकल आता एक नावजलेली लेखिका आहे. मात्र तरीही आज तिला अभिनेत्री म्हणूनच ओळखतात. तिने आपल्या मनोरंजन सृष्टीतील कारकिर्दीमध्ये अगदीच मोजकेच चित्रपट केले. त्यामधील ‘बादशाह’ सिनेमाने नुकतेच २० वर्ष पूर्ण केले. त्यानिमित्त एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या सिनेमासंदर्भातील आठवणींना उजाळा देणारी पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये त्या चाहत्याने १९९९ साली ‘रेडीफ’ने दिलेला सिनेमाचा रिव्ह्यू पोस्ट केला. या रिव्ह्यूमध्ये ट्विंकलच्या बेंबीबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर ट्विंकलने अगदी खोचक आणि मजेशीर उत्तर दिले आहे.
झालं असं की, रेट्रो बॉलिवूड नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बादशाह’ सिनेमाबद्दल पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये २७ ऑगस्ट १९९९ रोजी ‘रेडीफ’ने लिहिलेल्या रिव्ह्यूमधील काही ओळी पोस्ट करण्यात आल्या. चित्रपटाला वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लिहिलेल्या या पोस्टमध्ये ‘सिनेमामध्ये शाहरुख, ट्विंकल आणि ट्विंकलच्या बेंबीने चांगले काम केले आहे,’ असा टोला लेखकाने लगावला होता. संपूर्ण सिनेमामध्ये ट्विटंकलची बेंबी प्रामुख्याने दिसत होती असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
इन्स्टाग्रामवर करण्यात आलेल्या या पोस्टची दखल थेट ट्विंकलनेच घेतली. या इन्स्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉर्ट ट्विंकलने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट करत यावर आपले मत मांडले आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘माझ्या चित्रपटांना चांगला रिव्ह्यू मिळत नाही असं मी कधी म्हणाले होते का? मी माझ्या अवयवांच्या मदतीने भावना उफाळून येणारा अभिनय केला. ‘बादशाह’ सिनेमाला २० वर्षे झाली तरी या सिनेमात काम करणाऱ्या दोन्ही कलाकारांकडे त्यांच्याकडची विशेष गोष्ट आजही आहे: शाहरुखकडे त्याची खळी आणि माझ्याकडे माझी बेंबी. हा रिव्ह्यू पाठवून माझ्या दिवसाची तजेलदार सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद.’
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ट्विंकलच्या चाहत्यांना तिचे हे खोचक पण तितकेच मजेशीर उत्तर खूपच आवडल्याचे या पोस्टखालील कमेंटमधून पाहायला मिळत आहे.