बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच ट्विंकलने अक्षयचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरू हा फोटो शेअर केला आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या या फोटोत अक्षयने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. तर हा फोटो शेअर करत आपला माल (अक्षय कुमार)चे वय एखाद्या जुन्या विस्की प्रमाणे वाढते आहे. तुम्हाला पण असे वाटते का? असे कॅप्शन ट्विंकलने दिले आहे. ट्विंकलने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे.

आणखी वाचा : काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली….

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयने अलीकडेच त्याच्या ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. हा चित्रपट १८ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षय सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर २’ मध्ये दिसणार आहे. तर या आधी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.