Shark Tank India Funding Scam : ‘शार्क टॅंक इंडिया’च्या दोन्ही पर्वांना तरुणवर्ग, उद्योजकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे दोन्ही सीझन चांगलेच लोकप्रिय झाले होते. आता लवकरच या कार्यक्रमाचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, परंतु नव्या सीझनला सुरुवात होण्यापूर्वी उद्योजक अनमोल शर्माने कोणाचेही नाव न घेता ‘शार्क टॅंक इंडिया’ या शोवर काही आरोप केले आहेत.

हेही वाचा : ‘शिवरायांचा छावा’ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

उद्योजक अनमोल शर्माने ट्वीट करत ‘शार्क टॅंक इंडिया’मध्ये ‘डिलेड फंडिंग स्कॅम’ सुरू आहे, असा आरोप केला आहे. तसेच या कार्यक्रमामुळे तोट्यात सापडलेल्या स्पर्धकांची यादी शेअर करणार असल्याचे त्याने सांगितले. शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक स्पर्धकांना घोटाळ्याचा सामना करावा लागत असल्याचेही अनमोल याने त्याच्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा : “तुला फक्त पाहायचंय…” कुशल बद्रिकेला येतेय बायकोची आठवण; पोस्ट शेअर करत म्हणाला…

अनमोल शर्मा ट्वीट करीत म्हणाला, “मी आज ‘शार्क टॅंक इंडिया’मधील ‘डिलेड फंडिंग स्कॅम’बाबत तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. फक्त टीव्हीवर लोकांना दाखवण्यासाठी तुम्हाला आमच्याकडून बिझनेससाठी मदत मिळेल असे सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात शार्ककडून एक पैसाही मिळत नाही. अनेक कारणे देऊन फंडिंग द्यायला वेळ लावला जातो. या शोमधील शार्क स्टार्टअप सुरू केलेल्या स्पर्धकांना फारसा प्रतिसाद देत नाहीत यामुळेच हे स्पर्धक कालांतराने नाराज होऊन करारातून बाहेर पडतात.”

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’नंतर आता ‘७२ हूरें’ चित्रपटावरून वाद; लवकरच दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार टीझर, निर्माते म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शार्क टॅंक इंडिया’च्या अशा कारभारामुळे शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना इतर गुंतवणूकदारांकडून पैसे मिळत नाहीत. इतर गुंतवणूकदार म्हणतात, “तुमच्या बिझनेसमध्ये शार्कने गुंतवणूक केली आहे का? एकदा त्यांनी केली की मग आमच्याकडे या…अशा समस्यांचा सामना करावा लागतो.” असे आरोप अनमोल शर्माने त्याच्या ट्वीटमध्ये नमूद करत ‘शार्क टॅंक इंडिया’ शोवर केले आहेत.