बिग बॉस फेम उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या ड्रेसमुळे उर्फीला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. उर्फी जेवढी बिनधास्त आहे तेवढीच बोल्डही आहे. रविवारी संध्याकाळी मुंबई एअरपोर्टवर उर्फी जावेदचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. यावेळी तिच्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती काळ्या रंगाच्या लेस बॉडीसूटमध्ये दिसली. पण मजेदार गोष्ट अशी की पॅपराजींशी बोलताना तिने स्वतःच्या अतरंगी फॅशनवर बोल्ड कमेंट केली.

उर्फी जावेदचा स्वतःचं एक वेगळं स्टाइल स्टेटमेंट आहे. अलिकडेच जेव्हा ती एअरपोर्टवर स्पॉट झाली त्यावेळी तिने काळ्या रंगाचा बॉडीसूट, डेनिम आणि प्लॅटफॉर्म हिल्स अशा लूकमध्ये दिसली. सोशल मीडियावर तिच्या या लुकची बरीच चर्चा झाली. उर्फी तिचं आउटडोअर शूटिंग पूर्ण करून मुंबईला परतली होती. यावेळी ती फोटोग्राफर्सशी बोलताना दिसली. यावेळी तिने फोटोग्राफर्सना मिठाई देखील वाटली.

एअरपोर्टवरून निघताना आपल्या टीमसोबत बाहेर पडताना उर्फी म्हणाली, ‘मी खूप थकले आहे. मागच्या तीन दिवसांपासून सातत्यानं शूटिंग करत होते. माझ्या चेहऱ्यावर आता थकवा दिसून येत आहे. मला थंडीत शूटिंग करणं अजिबात आवडत नाही. मला असे छोटे कपडे घालायला आवडतात.’ एवढी बोलून उर्फी जोरजोरात हसू लागली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान उर्फीला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल व्हावं लागतं मात्र ती नेहमीच याकडे दुर्लक्ष करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती, ‘बिग बॉस ओटीटीनंतर लोकांनी मला नोटीस करायला सुरुवात केली. लोक मला माझ्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखतात. अर्थात त्यांनी मला ट्रोल केलं तरीही मी त्यांना यात बिझी ठेवते. ते माझ्याबद्दल बोलतात.’