urfi javed share how her boyfriend react on her lip filler remover look : उर्फी जावेद ही अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जी अनेकदा वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनाशी संबंधित सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करते. आपल्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच.

उर्फी वेगवेगळ्या हॉटेलबाहेर अतरंगी कपडे घालून दिसते. पूर्वी उर्फीवर भरपूर टीका व्हायची, पण आता तिचे कौतुक केले जाते. याशिवाय काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘द ट्रेटर्स’ या शोची ती विजेती बनली होती.

उर्फीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये उर्फीचे ओठ आणि चेहरा प्रचंड सुजलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते काळजीत पडलेत.

उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो खूपच वेदनादायक आहे. या व्हिडीओमध्ये डॉक्टर तिच्या ओठांमध्ये इंजेक्शन देताना दिसून येत आहेत. त्या इंजेक्शननंतर तिचे ओठ आणि चेहरा पूर्ण सुजलेला दिसला. उर्फीने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये खुलासा केला की, ही लिप फिलर हटवण्याची प्रकिया आहे.

उर्फीचे ओठ आणि चेहरा लिप फिलर काढल्यानंतर भयंकर सुजला आहे, त्यामुळे तिचा संपूर्ण लूक बदलला आहे. तिला अशा लूकमध्ये ओळखणेही कठीण झाले आहे. उर्फी जावेदने यावर तिच्या बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया काय होती याबद्दल सांगितले. त्यावर युजर्सनेदेखील मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्फीने स्वत:चा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मोबाईलवर काहीतरी पाहताना दिसते. तसेच तिच्या कॅप्शनमध्ये तिने बॉयफ्रेंडची प्रतिक्रिया लिहिली आहे. उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझा बॉयफ्रेंड म्हणाला मी प्रत्येक गोष्टीवर तोंड फुगवून बसते आणि ते खरं झालं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, “हे कुठलंही फिल्टर नाहीये. मी माझे फिलर्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, कारण ते चुकीच्या ठिकाणी बसले होते. मी पुन्हा फिलर्स घेईन, पण यावेळी नैसर्गिक पद्धतीने. फिलर्स वाईट आहेत असं मी अजिबात म्हणत नाही, पण फिलर्स काढून टाकणं खूप वेदनादायक असतं, तुम्ही फिलरसाठी चांगल्या डॉक्टरकडे जाणे खूप महत्त्वाचे आहे”, असं तिने म्हटलं आहे. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.