अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. उर्फीला अनेकदा विचित्र कपड्यांमध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. या कपड्यांमुळे उर्फीला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. नेटकऱ्यांनी कितीही ट्रोल केलं तरी उर्फी मात्र या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करते. यानंतर आता उर्फीने केलेले साडीतील फोटोशूट चर्चेत आले आहे.
नुकतंच उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील दोन फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने अभिनेत्री रविना टंडनच्या टिप-टिप बरसा पानी या गाण्यातील आयकॉनिक लूक रिक्रिएट केला आहे. विशेष म्हणजे यावेळी उर्फीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिचे केसही थोडे ओलसर असल्याचे दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करतेवेळी त्याला हटके कॅप्शन दिले आहे. “टिप टिप बरसा पानी…पानी ने…, या गाण्यातील दोन वाक्य तिने कॅप्शन म्हणून फोटोंना दिले आहे.
सध्या तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोखाली फायर, हार्ट यासारख्या इमोजी शेअर करत नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे तिचा हा फोटो पाहून अनेक जण व्हिडीओ प्लीझ अशाही कमेंट करताना दिसत आहे.
आणखी वाचा : “कधी तरी पूर्ण कपडे घालत जा”, बॅकलेस टॉपमुळे उर्फी जावेद पुन्हा ट्रोल
‘बिग बॉस ओटीटी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय शो ठरला. या शोमधून पहिल्याच आठवड्यात उर्फी जावेद बाहेर पडली. मात्र त्यानंतर तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत राहिली. उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कधी ब्रा फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटण न लावल्याने उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिच्या या हटके फॅशनमुळे अनेकदा नेटकरी तिला ट्रोल करतात.