एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने चित्रपटासाठी अगदी काही दिवसांत अनेक किलो वजन कमी केल्याच्या बातम्या आता नवीन नाहीत. सोशल मीडियावर कलाकारांच्या या ट्रान्सफॉर्मेशनची चर्चा नेहमीच रंगत असते. अभिनेत्री वाहबिज दोराबजीबाबत देखील अशाच प्रकारची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छोट्या पडद्यावरील या प्रसिद्ध अभिनेत्रीने अलीकडेच आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसं पाहिलं तर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर फोटो शेअर करणे आता काही नवीन नाही. परंतु वाहबिजचा हा बदललेला लूक पाहून मात्र चाहते अवाक् झाले आहेत. कारण तिने एक दोन नव्हे तर तब्बल १३ किलो वजन कमी केले आहे. तिचा हा नवा लूक पाहून नेटकरी पार सैराट झाले आहेत.

 

तिने आगामी वेब सीरिजसाठी वजन घटविले आहे आणि सध्या ती हेल्दी डाएट करते आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vahbiz dorabjee hot photo viral mppg
First published on: 19-10-2019 at 18:45 IST