बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेले वुई क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. टंडन यांनी सांगितलं की, ७० वर्षीय अभिनेत्री तनुजा यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने ऑक्सिजन लावावे लागले आहे. मात्र, आता त्यांची स्थिती सामान्य आहे. तनुजा कोलकाताला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या रात्रीच्या जेवणाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर लगेचचं रुग्णालयात नेण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress and kajols mom tanuja hospitalised after complaining of breathing problem
First published on: 11-11-2014 at 01:59 IST