प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले आहे. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते.

उत्तरा बावकर यांनी १९८६ मध्ये ‘यात्रा’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तमस’ या मालिकेतून त्या प्रकाशझोतात आल्या. ‘एक दिन अचानक’, ‘रुक्मावती की हवेली’, ‘द बर्निंग सीजन’, ‘सरदारी बेगम’ यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या.

त्याबरोबर उत्तरा बावकर यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ या मराठी चित्रपटात काम केले. ‘वास्तूपुरुष’ (२००२), ‘उत्तरायण’ (२००३), ‘शेवरी’ (२००६), ‘रेस्टोरेंट’ (२००६) यांसारख्या मराठी चित्रपटातही त्या झळकल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरा बावकर यांनी सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटात काम केले होते. मुद्रा अभिनय आणि आवाजी अभिनय यावर त्यांची हुकूमत होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम करत होत्या.