बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये ‘बच्चन’ यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर माध्यमांच्या नजरा खिळलेल्या असतात. गेल्या आठवड्यात संपूर्ण बच्चन कुटुंब त्यांच्या नात्यातील एका लग्नासाठी गेले होते. त्यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अमिताभ बच्चन त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता नंदा बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या असे हे संपूर्ण कुटुंब यावेळी फोटोत एकत्र पाहायला मिळाले. त्यानंतर काल अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या वरातीत नाचत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

PHOTO :… असा होता प्रार्थना बेहरेच्या लग्नातील हळद आणि मेहंदी कार्यक्रम

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

‘बिविचिंग बच्चन्स’ (Bewitching Bachchans) या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ‘दिल ले गई कुडी गुजरात की.. ‘ या पंजाबी गाण्यावर अभिषेक फार उत्साहात नाचत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळतोय. तर ऐश्वर्या आणि आराध्याही थिरकताना दिसतात.

वाचा : ‘इंडियन आयडॉल’ होण्याचे स्वप्न पाहणारा ‘तो’ आज आहे फराहचा आचारी

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉग आणि फेसबुकवरही लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. बिग बींचा अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्यासोबतचा फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधतोय. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या या मायलेकींनी गुलाबी रंगाचे ड्रेस घातले होते. तर बिग बी आणि ज्युनिअर बी म्हणजेच अभिषेकने शेरवानी घातल्या होत्या.

दरम्यान, यावर्षीच ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांचे निधन झाल्याने बच्चन कुटुंबाने कोणताच सण किंवा मोठा कार्यक्रम साजरा केला नाही. मात्र, येत्या १६ नोव्हेंबरला हे कुटुंब आराध्याचा सहावा वाढदिवस साजरा करणार असल्याचे म्हटले जातेय.