आपल्या आवडत्या कलाकाराला पाहिलं की प्रत्येक चाहत्याला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. पण कधीकधी आपल्या आवडत्या कलाकाराप्रती असलेले प्रेम त्या चाहत्याच्या अंगाशीसुद्धा येते. असाच काहीसा प्रसंग अभिनेता अक्षय कुमारच्या चाहत्यासोबत घडला. अक्षय कुमारचा सुरक्षारक्षक त्याच्या चाहत्याला कानशिलात लगावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
झालं असं की, अक्षय कुमार हा त्याच्या सुरक्षारक्षकांसोबत मुंबई विमानतळावरून येत होता. त्यावेळी एका चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अक्षयच्या सुरक्षारक्षकाने त्या चाहत्याच्या कानशिलातचं लगावली. त्यानंतर तो चाहता लगेचच बाजूला गेला. मात्र, अक्षयने याकडे काहीचं लक्ष न देता तो तिथून निघून गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video akshay kumars bodyguard punches a fan trying to take a selfie
First published on: 30-04-2016 at 11:16 IST