अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमातील दुसऱ्या दिवशी बॉलीवूड सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी रिहानाच्या परफॉर्मन्सने कार्यक्रमाची शोभा वाढविली, तर दुसऱ्या दिवशी बॉलीवूडकरांचे डान्स पाहायला मिळाले. इतकंच नाही तर अंबानी कुटुंबाने ब्राव्हो व धोनी यांच्याबरोबर दांडिया रास केला.

प्रसिद्ध क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो व भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यांना घेऊन मुकेश अंबानी व नीता अंबानी दांडिया खेळायला आले. या दोन्ही क्रिकेटपटूंच्या हातात बॅटऐवजी दांडिया होते. त्यांना आकाश अंबानीने दांडिया खेळायला शिकवलं आणि नंतर ते इतर काही जणांबरोबर दांडिया खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले. ब्राव्हो व धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Video : बॉलीवूडचे तीन खान आले एकत्र! अनंत अंबानींच्या प्रे-वेडिंगमध्ये सलमान-शाहरुख व आमिरचा डान्स; गाणं होतं खूपच खास

धोनी व ब्राव्होच्या या दांडिया खेळतानाच्या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काहींनी धोनीच्या लूकसंदर्भातही व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. ब्राव्हो व धोनीचा दांडिया उपस्थितांनी एंजॉय केल्याचं पाहायला मिळालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या तीन दिवसांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचा आज समारोप होणार आहे. जामनगरमधील या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे.