बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत मोठ्या पडद्यावरील भूमिकेत समरस होऊन एखाद्या संतप्त स्त्रीची भूमिका साकारताना तुम्ही अनुभवली असेल. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात राग अनावर झालेली कंगना तुम्ही कदाचित पाहिली नसेल. कंगनाचा प्रत्यक्ष आयुष्यातील एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, व्हिडिओमध्ये ती सहायकावर भडकताना नजरेस पडते. व्हिडिओत कंगना सहायकाशी संवाद साधत असून, कंगनावर चित्रीत होणाऱ्या एका दृश्यात ड्युप्लिकेट वापरासंबधी सहायक तिला माहिती देताना दिसतो. आपण ड्युप्लिकेटसह काम करत नसल्याचे सांगत कंगना सहायकावर चिडते आणि ड्युप्लिकेटची काय आवश्यकता आहे, अशी विचारणा करते. कंगनाचे वजन जास्त असल्याने तिला दृश्य साकारताना अडचण येऊ शकते, असे सहायक तिला समजावून सांगतो. याबाबत आपल्याला केणीही पूर्व कल्पना दिली नसल्याची प्रतिक्रिया कंगना देते. चिडलेल्या कंगनाचा राग अनावर होऊन ती सहायकावर भडकते. या व्हिडिओच्या चित्रीकरण स्थळाविषयी अधिकृत खुलासा होऊ शकला नसला, तरी सूत्रांकडील माहितीनुसार तो ‘रंगून’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान व्हॅनेटी व्हॅनमध्ये शूट झाल्याचे समजते. सध्या कंगना ‘रंगून’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: कंगनाची सहायकावर आगपाखड!
कंगना व्हिडिओमध्ये सहायकावर भडकताना नजरेस पडते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-03-2016 at 16:12 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viedo viral on internet actress kangana ranaut loses temper on the sets of film