साऊथ स्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेची मुख्य भूमिका असलेला लायगर चित्रपट आज गुरुवारी (२५ ऑगस्ट) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात विजय आणि अनन्यासह बॉक्सिंग लिजेंड माइक टायसन स्वतः दिसणार आहेत. दरम्यान, विजयने टायसनबाबत एक खुलासा केला आहे. टायसन चित्रपटाच्या सेटवर शिव्या द्यायचा असं विजयने म्हटलंय.

हेही वाचा – आलियावर केलेल्या ‘त्या’ विनोदाबद्दल रणबीरने मागितली जाहीर माफी; म्हणाला, “माझ्या चेहऱ्यावरील हावभाव…”

विजय नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला, “टायसन चित्रपटाच्या सेटवर मला खूप शिव्या द्यायचा. त्या शिव्या इंग्रजीत होत्या आणि त्या मी इथे सांगू शकत नाही. पण टायसन मला प्रेमाने शिव्या द्यायचा. मी सेटवर त्याच्यासोबत चांगला वेळ घालवला.” तसेच माइकला भारतीय संस्कृतीबद्दल विशेष प्रेम असल्याचंही विजयने सांगितलं. “माइक टायसनला भारतीय जेवण, संगीत आणि लोक खूप आवडतात. तो सेटवरही भारतीय पदार्थ आणण्याची मागणी करायचा. ते पदार्थ तो खूप आनंदाने खायचा. तसेच माइक इथल्या गर्दीला खूप घाबरतो. त्यामुळे इथे आल्यावर तो हॉटेलमध्येच थांबला. विमानतळ किंवा इतर ठिकाणी गर्दीची त्याला खूप भीती वाटते,” अशी माहिती विजयने टायसनबद्दल दिली.

हेही वाचा – मिया, बिवी और वो…! ‘या’ गोष्टीवरुन रात्रभर होतात शाहिद कपूर आणि मीराची भांडणं

दरम्यान, अनन्या पांडेनेही टायसनसमवेत काम करण्याचा अनुभव शेअर केला. “सेटवर आमची खूप चांगली बाँडिंग होती. आम्हा दोघांना जेवणाची आवड होती आणि म्हणूनच आम्ही एकत्र खूप वेळ घालवला. आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणून नये, हे मी टायसनपासून शिकले,” असं अनन्याने सांगितलं.

हेही वाचा – KBC: ‘देशातील कोणत्या विमानतळाचं नाव वैमानिकाच्या नावावर आहे?’ उत्तर न आल्याने स्पर्धकाने सोडला खेळ

लायगर हा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला चित्रपट आहे. तो कन्नड, मल्याळम, तामिळ, तेलुगू आणि हिंदीमध्ये एकाच वेळी रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात रम्या कृष्णन, रोनित रॉय यांच्याही भूमिका आहेत.