गेल्या वर्षी कलाविश्वातील काही प्रसिद्ध जोडप्यांचा विवाहसोहळा पार पडला. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आणखी एक बहुचर्चित जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. ही रिअल लाइफ जोडी नाही तर रिल लाइफ जोडी आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या या मालिकेत लग्नाची गडबड पाहायला मिळत आहे.

इशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नाला अखेर कुटुंबीयांकडून परवानगी मिळाली आहे. ही परवानगी मिळवण्यासाठी इशा आणि विक्रांतने बरेच अडथळे पार केले आहेत. येत्या १३ जानेवारी रोजी या बहुचर्चित मालिकेत शाही थाटात विवाहसोहळा पार पडणार आहे. १३ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हे लग्न होणार आहे. या लग्नाची बोलणी झाली असून इशाला सरंजामे कुटुंबीयांनी सून म्हणून स्विकारलं असून तिला ‘टिळा’ लावण्याचा कार्यक्रम देखील पार पडला आहे.

वाचा : झी मराठीवर मनोरंजनाचा खास रविवार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठमोळ्या लग्न विधींकरता विक्रांत सरंजामे यांनी महाराष्ट्रातील भोर या ठिकाणची निवड लग्नासाठी केली आहे. लग्नाची गडबड सुरू असतानाच समोर इशा आणि विक्रांत यांच्या शाही लग्नाची शाही पत्रिका समोर आली आहे. निमकरांनी आपल्या कुवतीप्रमाणे १६० रुपयांची पत्रिका निवडली होती पण सरंजामे कुटुंबाची ही पत्रिका पाहून तुमचे देखील डोळे दिपून जातील.