सब टीव्हीवरच्या ‘एफआयआर’मध्ये आत्तापर्यंत ९९९ प्रकरणे धसास लावणाऱ्या इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटालाच्या (कविता कौशिक) जोडीला आता इन्स्पेक्टर भोला पंडित येणार आहे. भोलाच्या भूमिकेत टीव्हीवर विविध मालिकांमधून काम केलेला अभिनेता विपुल रॉय दिसणार आहे. रावणपूर शहरात वरिष्ठ म्हणून दाखल होणारा भोला आणि चंद्रमुखी दोघेही एकत्र येऊन गुन्हेगारांचा खातमा करण्याच्या मिशनवर जाणार आहेत.
रावणपूर शहरात बदली होऊन आलेला भोला पंडित हा इन्स्पेक्टर तत्त्ववादी आणि स्वभावाने साधाभोळा आहे. त्यामुळे पहिल्याच भेटीत चंद्रमुखीला तो ठग वाटतो. पण नंतर भोलाची इमाम चौकीत नियुक्ती झाल्याचे तिला समजते आणि सगळे रुसवे-फुगवे दूर होऊन दोघेही कामासाठी एकत्र येतात, अशा वेगळ्या वळणावर ‘एफआयआर’ची कथा सुरू होणार आहे. या भूमिकेविषी बोलताना, आपण आतापर्यंत एका चांगल्या विनोदी भूमिकेच्या अपेक्षेत होतो, असे विपुलने सांगितले. ‘एफआयआर’ हा शो माझ्यासह घरच्यांनाही आवडतो. या शोमधील प्रत्येक व्यक्तिेरेखेचा विनोदाचे टायमिंग, विनोदाची जाण, संवादफेकीची शैली यामुळे ही मालिका मला प्रचंड आवडते. आता मलाच या मालिकेत काम करायची संधी मिळाल्यामुळे खूप आनंद झाला असून लवकरच चित्रीकरणाला जोरदार सुरुवात होईल आणि तेव्हा खरी गंमत येईल, असे विपुल रॉयने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2013 रोजी प्रकाशित
‘एफआयआर’मध्ये विपुल रॉयचा प्रवेश
सब टीव्हीवरच्या ‘एफआयआर’मध्ये आत्तापर्यंत ९९९ प्रकरणे धसास लावणाऱ्या इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटालाच्या (कविता कौशिक) जोडीला आता इन्स्पेक्टर भोला पंडित येणार आहे.

First published on: 17-09-2013 at 06:19 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vipul rais new entry in fir tv show