बॉलीवूड अभिनेता विर दास आपली प्रेयसी शिवानी माथुरसोबत श्रीलंकेमध्ये विवाहबद्ध झाला. पण, या विवाह सोहळ्याबाबत दोघांकडूनही कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. श्रीलंकेतील एका हॉटेलमध्ये छोटेखानी सोहळ्यात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. सोहळ्याला जेमतेम शंभरएक जणांनाच निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या लग्नसोहळ्याबाबत गुप्तता बाळगण्यासाठी निमंत्रितांना मोबईल बंद ठेवण्याचा नियमच लागू करण्यात आला होता.
शाही मानपान न करता अगदी थोडक्यात विवाह सोहळा करणार असल्याचे या प्रेमीयुगुलाने याआधीच जाहीर केले होते. त्यानुसार केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत श्रीलंकेतील एका हॉटेलमध्ये हा सोहळा झाल्याचे विर दासने सांगितले.
बॉलीवूडच्या आगामी ‘संता बंता’ आणि ‘मस्तिजादे’ चित्रपटांमध्ये विर दास दिसणार आहे. तर, शिवानीचेही चित्रीकरणाचे वेळापत्रक पूर्ण व्यस्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Nov 2014 रोजी प्रकाशित
विर दासचे शिवानी माथुरसोबत गुपचूप शुभमंगल!
बॉलीवूड अभिनेता विर दास आपली प्रेयसी शिवानी माथुरसोबत श्रीलंकेमध्ये विवाहबद्ध झाला. पण, या विवाह सोहळ्याबाबत दोघांकडूनही कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती
First published on: 19-11-2014 at 03:10 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vir das marries girlfriend shivani mathur at a secret ceremony