चित्रपटातील भूमिकांकरिता बॉलीवूड कलाकार काही ना काही प्रयोग करताना दिसतात. कुणी वजन वाढवतं तर कुणी चेह-यात बदल घडवून आणतं. असाच बदल बॉलीवूडमधील विनोदी कलाकार आणि अभिनेता असलेल्या एका कलाकाराने केला आहे. या अभिनेत्याने गो गोवा गॉन आणि रिवॉल्वर राणी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तरी नक्कीच तुम्ही याला ओळखल असेल. हो अगदी बरोबर ओळखलत तुम्ही हा आहे अभिनेता ‘वीर दास’. आगामी ‘३१ ऑक्टोबर’ या चित्रपटासाठी त्याने लुक मध्ये खास बदल केले आहेत. त्याचाच एक फोटो त्याने ट्विटरवरसुद्धा शेअर केला.
वीर दासने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असून लुक मध्ये बदल करण्याबरोबरच आपले वजनसूद्धा वाढवले आहे. अभिनेता वीर दास हा या चित्रपटात पंजाबी अभियंताच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘३१ ऑक्टोबर’ हा चित्रपट इंदिरा गांधींच्या हत्त्येवर आधारीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vir das presents something new
First published on: 06-02-2016 at 18:33 IST