ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक एड शीरनचा ‘शेप ऑफ यू’ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ठाऊक आहे. त्याच्या या गाण्याने बॉलिवूड सेलिब्रिटींनाही वेड लावले आहे. सोशल मीडियावर आणि तरुणाईमध्ये त्याच्या या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकांनी तर या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन्सही शेअर केले आहेत.

‘शेप ऑफ यू’चा आणखी एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे. भोजपुरी, कर्नाटकी या सगळ्या व्हर्जननंतर आता बॉलिवूडचा क्लासिक व्हर्जन तयार करण्यात आला आहे आणि क्लासिक व्हर्जनमध्ये इतर कोणी नसून तर बॉलिवूडचा ‘शोमॅन’ राज कपूर ‘शेप ऑफ यू’ करताना दिसत आहे.

वाचा : …म्हणून प्रियांका आणि ‘हा’ जगप्रसिद्ध रॅपर एकत्र आले

राज कपूर आणि वहिदा रेहमान ‘शेफ ऑफ यू’वर नाचतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ‘बिइंग इंडियन’ने त्यांच्या फेसबूक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला असून २४ तासांच्या आत १.५ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. १९६३ मधील ‘एक दिल सौ एफसाने’ चित्रपटातील वहिदा आणि राज कपूरची डान्सची क्लिप वापरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. फेसबूकसोबतच ट्विटरवरही हा व्हिडिओ प्रचंड गाजत आहे.